चिमुकली अवनी करणार ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’चं सूत्रसंचालन, वडील देखील सुप्रसिद्ध गायक!

स्टार प्रवाहवर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ (Me Honar Superstar) हे संगीताचं नवं पर्व सुरु होतंय. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Sidhharth Chandekar) आणि सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीची (Anirudh Joshi) मुलगी अवनी जोशी करणार आहेत.

1/5
स्टार प्रवाहवर ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ (Me Honar Superstar) हे संगीताचं नवं पर्व सुरु होतंय. 5 ते 14 या वयोगटातील मुलांना या अनोख्या स्पर्धेत झळकण्याची संधी मिळणार आहे. 4 डिसेंबरपासून रात्री 9 वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Sidhharth Chandekar) आणि सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीची (Anirudh Joshi) मुलगी अवनी जोशी करणार आहेत.

2/5
अनिरुद्ध आणि त्याची पत्नी रसिका जोशी दोघंही शास्त्रीय गायक आहेत. त्यामुळेच अवनीमध्येही गायनाची आवड उपजत होतीच. सात वर्षांच्या अवनीला गाण्यासोबतच अभिनयाची देखिल आवड आहे. अवनीच्या याच आवडीमुळे तिची ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’च्या सूत्रसंचलनासाठी निवड झाली.

3/5
अवनीसाठी हा नवा अनुभव असणार आहे. याआधी स्टार प्रवाहच्या ‘साथ दे तू मला’ या मालिकेत अवनी बालकलाकाराच्या रुपात दिसली होती.

4/5
‘मी होणार सुपरस्टार’च्या सुत्रसंचलनासाठी ती खूपच उत्सुक आहे. नुकतंच सिद्धार्थ चांदेकरसोबत तिने या कार्यक्रमाचा प्रोमो शूटही केला. सेटवर ती बऱ्याच गोष्टींचं निरीक्षण करत असते. शूटचा मनमुराद आनंद लुटत असते.

5/5
त्यामुळे मी होणार सुपरस्टारच्या मंचावर सिद्धार्थ चांदेकर आणि चिमुकल्या अवनीची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तेव्हा 4 डिसेंबरपासून रात्री 9 वाजता पाहायला विसरु नका नवा कार्यक्रम ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ फक्त स्टार प्रवाहवर.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI