Photo : गंगूबाईपासून ते बेल बॉटमपर्यंत ‘या’ चित्रपटांची प्रेक्षकांना प्रतिक्षा, चित्रपटगृहात होणार रिलीज

कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानं आता बड्या चित्रपटांनी प्रदर्शनाची घोषणा केली आहे. (From Gangubai to Bell Bottom, these Movies will be released in cinemas)

1/5
Bollywood Movie
लॉकडाऊन दरम्यान सिनेसृष्टीचं प्रचंड नुकसान झालं आहे. कोरोनामुळे बहुतेक वेळा थिएटर आणि मल्टिप्लेक्स बंद होते. आता पुन्हा एकदा परिस्थिती सामान्य होत असल्याचं दिसतय अशात थिएटर मालकांना आशेचा किरण दिसू लागला आहे. दरम्यान, बड्या चित्रपटांनी प्रदर्शनाची घोषणा देखील केली आहे.
2/5
Bell Bottam
या यादीतील पहिलं नाव आहे बेल बॉटम. अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी स्टारर फिल्म ‘बेल बॉटम’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतंच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.
3/5
Gangubai
गंगूबाई काठियावाडी : आलिया भट्ट (Alia Bhatt) अभिनीत हा चित्रपटही यावर्षीच्या सर्वाधिक प्रलंबीत चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचा टीझर व्हिडीओ प्रसिद्ध झाला असून लवकरच निर्माते हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करणार आहेत.
4/5
RRR
बाहुबली (Bahubali) चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली (S.S. Rajamouli) यांचा आर.आर.आर. (RRR) चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या मल्टीस्टारर फिल्ममध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अजय देवगणही (Ajay Devgn) महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.
5/5
Attack
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा ‘अटॅक’ हा चित्रपटही लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रकुल प्रीतही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.