Happy Birthday Anjana Sukhani | ‘बिग बीं’सोबत कॅडबरीची जाहिरात ते बॉलिवूडचे चित्रपट, डिप्रेशनमुळे ब्रेक घेऊन दमदार कमबॅक करणारी अंजना सुखानी!

अभिनेत्री आणि मॉडेल अंजना सुखानी (Anjana Sukhani) आज तिचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 10 डिसेंबर 1978 रोजी जयपूर येथे झाला. अंजनाने करिअरच्या सुरुवातीच्या काळात टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले होते.

Dec 10, 2021 | 8:00 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 10, 2021 | 8:00 AM

अभिनेत्री आणि मॉडेल अंजना सुखानी (Anjana Sukhani) आज तिचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 10 डिसेंबर 1978 रोजी जयपूर येथे झाला. अंजनाने करिअरच्या सुरुवातीच्या काळात टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले होते.

अभिनेत्री आणि मॉडेल अंजना सुखानी (Anjana Sukhani) आज तिचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 10 डिसेंबर 1978 रोजी जयपूर येथे झाला. अंजनाने करिअरच्या सुरुवातीच्या काळात टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले होते.

1 / 6
अंजना पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत कॅडबरी चॉकलेटच्या जाहिरातीत दिसली होती. ती जाहिरात खूप पसंत केली गेली होती.

2 / 6
अंजना एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या स्टार्ससोबत तिने काम केले आहे. 'घर जायेगी' या गाण्यातून अंजनाला नवी ओळख मिळाली. त्यानंतर तिने इंडस्ट्रीत खूप काम केले.

3 / 6
सलाम-ए-इश्क, गोलमाल रिटर्न्स, गुर न्यूज, शानदार, साहब बीवी और गँगस्टर रिटर्न्स आणि जश्न इत्यादी चित्रपटांमध्ये ती झळकली होती.

4 / 6
अंजना जवळपास 2 वर्ष डिप्रेशनमध्ये होती. अंजनाच्या मावशीचे सुमारे 2 वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. यानंतर तिच्या आजीचेही निधन झाल्याने ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकली नाही. अंजना म्हणाली, 'माझ्या मावशीचे लग्न झाले नव्हते, त्यामुळे मी नेहमी तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये राहायचे. तिचा त्रास बघून मला देखील खूप त्रास झाला.’

5 / 6
सतत 4 ते 6 महिने उपचार घेतल्यानंतर तिने मनोरंजन विश्वातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. 2 वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री अक्षय कुमारच्या ‘गुड न्यूज’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर परतली. यानंतर ती जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीसोबत ‘मुंबई सागा’ चित्रपटात दिसली होती.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें