PHOTO | वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी ‘आजी’ बनली हृतिक रोशनची ‘ही’ अभिनेत्री, नातीचे फोटो केले सोशल मीडियावर शेअर!

बॉलिवूडमध्ये अनेक परदेशी अभिनेत्री आपले नशीब आजमावण्यास येतात. काही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये बऱ्याच पुढे जातात, पण काही अभिनेत्री अशा असतात ज्यांचे बॉलिवूड करिअर एक-दोन चित्रपटांपुरते मर्यादित राहते. यापैकी एक नाव आहे अभिनेत्री बार्बरा मोरी (Barbara mori).

1/8

2/8
बार्बरा मोरीने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरूवात हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्या फिल्म ‘काईट’मधून केली होती. पण यानंतर ती बॉलिवूडच्या कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. मात्र, ती मेक्सिकन चित्रपटांचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे

3/8
‘काईट’ या चित्रपटाला 11 वर्षे उलटून गेली आहेत. बार्बरा आणि हृतिकशिवाय अभिनेत्री कंगना रनौतसुद्धा या चित्रपटात दिसली होती.

4/8
अभिनेत्री बार्बरा मोरीचा जन्म 2 फेब्रुवारी 1978 रोजी उरुग्वे येथे झाला होता. 1996 साली अभिनेत्री सर्जिओ मेयरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. या नात्यातून तिला एक मुलगा असून त्याचे नाव सर्जिओ मेयर मोरी आहे.

5/8
या नात्याशिवाय या अभिनेत्रीने बास्केटबॉल खेळाडू केनेथ रे सिगमनशी 2016 साली लग्न केले होते. पण लग्नाच्या एक वर्षानंतर 2017मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

6/8
आता मुलगा मोठा झाला आहे आणि त्याला एक मुलगी देखील आहे. ज्याचे नाव मिला आहे. मिला फक्त 6 वर्षांची आहे. अशा प्रकारे ‘काईट’ चित्रपटाची अभिनेत्री बार्बरा मोरी वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी आजी बनली आहे. अभिनेत्री सध्या 43 वर्षांची आहे.

7/8
बार्बरा मोरीच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे, तर ‘काईट’ या चित्रपटाशिवाय 2005 मध्ये आलेला ‘माय ब्रदर्स वाईफ’, 2008 मध्ये Violanchelo, साल 2008 मध्ये इनसिग्निफिकेंट थिंग्स, 2014 मध्ये कान्टफ्लास आणि 2016 मध्ये Treintona, solteray fantástica  या चित्रपटांचा ती एक भाग होती.

8/8
अभिनेत्री सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असून, तिचे बोल्ड फोटो शेअर करत राहते. याशिवाय ती आपला मुलगा आणि नातीची फोटो देखील शेअर करते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI