Photo : ‘कोविशिल्ड’चं पहिलं विमान पुण्यावरुन दिल्लीसाठी रवाना, पाहा फोटो

पूणे विमानतळावरुन ही लस देशभर पाठवली जाणार आहे.(Covishield’s first flight left from Pune for Delhi, see photo)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:55 PM, 12 Jan 2021
महाराष्ट्र: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून तीन ट्रकमध्ये कोविशिल्डची लस आज पहाटे पुणे विमानतळावर पोहोचली. विमानतळावरून देशभर लस पाठवली जाणार आहे.
देशात लस देण्याचं काम 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. 'कोविशिल्ड' लस वाहून नेणारं पहिलं विमान पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीसाठी रवाना झालं आहे.
तीन ट्रकमध्ये आलेली ही लस 8 जहाजांसह देशातील 13 वेगवेगळ्या ठिकाणी पाठवली जाणार आहे. एसबी लॉजिस्टिक कंपनी ही लस हवाईमार्गाद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार आहे.
रेफ्रिजरेटर ट्रकसह कूल एक्स नावाच्या कंपनीमार्फत ही लस महाराष्ट्रासह देशातील अन्य ठिकाणी पोहोचवली जाणार. कूल एक्स 10 पेक्षा जास्त वर्षांपासून औषधं आणि लस एका जागेपासून दुसर्‍या जागेवर नेण्यासाठी कार्यरत आहेत.
सरकारनं सीरम इन्स्टिट्यूटला 11 दशलक्ष (10 कोटी) कोव्हिशिल्ड लसीची ऑर्डक दिली आहे. सुरुवातीला कोविशिल्ड लससाठी प्रति डोस 200 रुपये खर्च येणार आहे.