केवळ मासेच नाही, तर दुधासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ! जाणून घ्या का…

दूध हे स्वत:च एक संपूर्ण आहार आहे. केवळ लहान मुलेच नाही, तर दूध सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. महिला असो की, पुरुष प्रत्येकाला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.

Mar 16, 2021 | 3:52 PM
Harshada Bhirvandekar

|

Mar 16, 2021 | 3:52 PM

दूध हे स्वत:च एक संपूर्ण आहार आहे. केवळ लहान मुलेच नाही, तर दूध सर्व वयोगटातील लोकांसाठी फायदेशीर आहे. महिला असो की, पुरुष प्रत्येकाला दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. दुधामध्ये कॅल्शियम, आयोडीन, पोटॅशियम, फॉस्फरस आणि व्हिटामिन डीचे गुणधर्म आढळतात. दुधाचे सेवन करण्याच्या फायद्यांविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु दुधासह काही विशिष्ट गोष्टींचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

1 / 8
दुधासह खाण्यास मनाई असणाऱ्या अशा बर्‍याच गोष्टी आहेत. त्या गोष्टी दुधासह एकत्र खाल्ल्याने आपल्या आरोग्यास हानी पोहचू शकते. आयुर्वेदात दुधाबरोबर काही विशिष्ट गोष्टींचे सेवन करण्यासही मनाई केली गेली आहे. यापैकी पहिला घटक आहे मासे.

2 / 8
दुधाचा परिणाम थंड असतो आणि माशांचे तापमान उबदार आहे. म्हणून दूध आणि दहीसह मासे न खाण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने गॅस, अॅलर्जी आणि त्वचा रोग होण्याची शक्यता असते.

3 / 8
लिंबू, फणस, कारले इत्यादी घटक दुधाबरोबर एकत्र खाऊ नयेत. असे केल्याने त्वचेचा संसर्ग होण्याची शक्यता असते. हे पदार्थ एकत्र खाल्ल्याने खरुज, खाज सुटणे, इसब, सोरायसिस इत्यादी होण्याची शक्यता असते.

4 / 8
मूग, उडीद व इतर डाळी दुधाबरोबर घेऊ नयेत. त्याच वेळी, गाजर, रताळे, बटाटे, तेल, गूळ, मध, लसूण आणि आम्ल पदार्थ न घेण्याचा सल्ला दिला जातो. हे पदार्थ खायचे असतील तर त्यांच्यामध्ये कमीतकमी 2 तासांचे अंतर असले पाहिजे. विशेषतः उडदाची डाळ दुधाबरोबर घेतल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता निर्माण होते.

5 / 8
दुधाबरोबर कधीही आंबट गोष्टीं खाऊ नयेत. तसेच, मुळा किंवा कोणत्याही भाज्या असलेले सलाड खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये. असे केल्याने दूधही विषारी होऊ शकते आणि त्वचेचा आजार होण्याची शक्यता असते.

6 / 8
डॉक्टरांच्या मते दुधाबरोबर फळांचे सेवन केल्यास दुधामध्ये असलेले कॅल्शियम फळांचे बरेच एंझाइम स्वतःमध्ये शोषून घेतात आणि त्यामुळे शरीराला पोषण मिळत नाही. विशेषत: संत्री आणि अननस यासारखी लिंबूवर्गीय फळे अजिबात दुधाबरोबर घेऊ नयेत.

7 / 8
उपवासादरम्यान बरेच लोक बनाना शेक करतात किंवा केळी आणि दूध एकत्र घेतात. मात्र, असे कधीही करू नये. केळी आणि दूध कफ वाढवतात. दोघांचे एकत्र सेवन केल्याने कफ जास्त वाढतो. तसेच, आपल्या पाचन तंत्रावर देखील त्याचा वाईट परिणाम दिसून येतो.

8 / 8

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें