डॉ.मनमोहन सिंह, जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी ज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेची दशा आणि दिशा बदलली…

देशाला आर्थिक विकासाची कवाडे उलगडणारे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे आज ९२ व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने देशाला आर्थिक संकटातून वाचविणारा थोर अर्थतज्ज्ञ आणि मृदू भाषी राजकारणी गमावला आहे अशाच प्रतिक्रीया सर्वस्तरातून व्यक्त होत आहे. मनमोहन सिंह यांच्या निधनाने देशभरात शोकलहर उमटली आहे. त्यांच्या कारकीर्दीने देशाला आर्थिक स्थैर्य दिले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक मंदीच्या झळा बसू दिल्या नाहीत.

| Updated on: Dec 26, 2024 | 11:23 PM
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. त्यांनी भारताचे आर्थिक उदारीकरण आणि सुधारणांचे जनक मानले जाते. साल १९९१ मध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला नव्या युगात नेले

1 / 10
 साल २००४ साली युपीए सरकारमध्ये ते देशाचे १३ वे पंतप्रधान झाले. त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर साल २००९ ते २०१४ पर्यंत ते देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले.

2 / 10
यापूर्वी तेरा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात सरकारमध्ये भारताचे ते अर्थमंत्री बनले.पंतप्रधान असताना त्यांनी अनेक साहसी निर्णय घेतले. परंतू त्याहून अधिक योगदान त्यांनी अर्थमंत्री असताना दिले. १९९१ मध्ये त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला जगाची कवाडे खुली करून आर्थिक उदारीकरणाची सुरुवात केली.

3 / 10
मनमोहन सिंह यांनी लायसन्स राज समाप्त केले. आर्थिक सुधारणांना पुढे नेले. ते जेव्हा अर्थमंत्री बनले तेव्हा देशाची अवस्था बिकट होती.देशाला आपला खर्च चालविण्यासाठी सोने गहाण ठेवावे लागले. परंतू मनमोहन सिंह यांनी पदभार सांभाळताच परिस्थिती सुधारली.

4 / 10
मनमोहन सिंह यांनी  रुपयांचे अवमुल्यन केले. टॅक्स कमी केला. विदेशी गुंतवणूकीला प्रोत्साहन दिले आणि विदेशी उद्योगजकांना भारताकडे आकर्षित केले,त्यामुळे अर्थव्यवस्थेची गाडी वेगाने धावू लागली. ते साल १९९६ पर्यंत देशाचे अर्थमंत्री होते.

5 / 10
 साल २००४ मध्ये मनमोहन देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर तत्कालिन अर्थमंत्री पी.चिदंबरम यांच्या सोबत मिळून त्यांनी अर्थव्यवस्थेला वेग दिला. हा काळ  भारतीय अर्थव्यवस्थेच सुवर्णकाळ म्हटला जातो.

6 / 10
 भारताचा जीडीपीची वाढ त्यांच्या काळात ८ ते ९ टक्के झाली. साल २००७ मध्ये भारताने ऐतिहासिक रुपात ९ टक्क्यांचा जीडीपी ग्रोथ रेट मिळविला आणि भारत दुसरी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला.

7 / 10
साल २००५ मध्ये मनमोहन सिंह यांनी व्हॅल्यू एडेड टॅक्सची व्यवस्था सुरु केला आणि जुन करप्रणाली रद्द  केली. व्यापारी आणि उद्योजकांवर कराचा बोजा कमी करण्यासाठी सर्व्हीस टॅक्सची व्यवस्था सुरु केली.त्यामुळे महसूलाचे नुकसान झाले नाही.  मनमोहन सिंह यांनी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी ( नरेगा ) या योजनेची सुरुवात केली. त्यानंतर तिचे नाव मनरेगा करण्यात आले. त्यांच्या काळात साल २००६ मध्ये देशात स्पेशल इकॉनॉमिक झोन सुरु केले.

8 / 10
 मनमोहन सिंह यांनी आपली सुरुवात विदेश व्यापार विभागात आर्थिक सल्लागार,नंतर अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार, अर्थ मंत्रालयाचे सचिव म्हणून काम केले. साल १९७६ ते १९८० पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक आणि त्यानंतर १९८२ ते १९८५ पर्यंत रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर राहीले.

9 / 10
 २६ सप्टेंबर १९३२ रोजी  तत्कालिन अखंड हिंदूस्थानातील पंजाब राज्यात जन्मलेल्या मनमोहन सिंह यांनी साल १९४८ मध्ये मॅट्रीक पास केले. पंजाब विद्यापीठातून शिक्षण घेतले, त्यांनी १९५७ मध्ये ब्रिटनच्या कॅमब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक्सची पदवी पहिल्या श्रेणीत मिळविली.त्यानंतर १९६२ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून डी.फिल केले. ते योजना आयोगाचे उपाध्यक्ष आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष बनले.त्यांना पद्मभूषण, इंडियन सायन्स काँग्रेसचा जवाहर लाल नेहरु जन्म शताब्दी पुरस्कार, वित्तमंत्री म्हणून एशिया मनी अवॉर्ड आणि युरो मनी अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहे.

10 / 10
Follow us
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.