AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृष्णामाईच्या पात्रात हळदी-कुंकू बदकांचा मुक्त विहार, मनमोहक दृश्याने वेधले सांगलीकराचं लक्ष…

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने सांगलीत कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. तिच्या वाढलेल्या पात्रात हळदी-कुंकू बदकांच्या थव्याने मुक्तपणे विहार करत निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Updated on: Jul 08, 2026 | 6:55 PM
Share
 सांगली येथे कृष्णा नदीच्या शांत प्रवाहात बदके एकसाथ पोहत आहेत,कधी पाण्यात बुडी मारत आहेत तर कधी पंख फडफडवत संचार करीत आहेत. या बदकांचे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून ते पाहणाऱ्यांना ती भुरळ घालीत आहेत.

1 / 5
सांगली कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असताना तिच्या वाढलेल्या पात्रात हळदी-कुंकू बदकांच्या थव्याने मुक्तपणे विहार करीत असताना पाहून निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

सांगली कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असताना तिच्या वाढलेल्या पात्रात हळदी-कुंकू बदकांच्या थव्याने मुक्तपणे विहार करीत असताना पाहून निसर्गप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.

2 / 5
ही बदके कृष्णानदीच्या शांत प्रवाहात एकसाथ पोहताना मनमोहक वाटत आहेत. कधी पाण्यात बुडी मारीत तर कधी पंख फडफडवत  ही बदके संचार करीत आहेत. या बदकांचे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून ते पाहणाऱ्यांना भुरळ घालत आहे.

3 / 5
हळदी-कुंकू जातीचे बदक हे जंगली बदकांपैकी आकाराने सर्वात मोठ्या बदकांपैकी एक मानले जाते.या बदकाच्या पिसांवर खवल्यांसारखी पिवळट आणि गडद उदी रंगाची आकर्षक नक्षी असते.पंखांच्या बाजूला पांढऱ्या आणि चमकदार हिरव्या रंगाचा दुरंगी पट्टा उठून दिसतो.त्यांचे पाय नारिंगी-तांबडे असतात, तर काळ्या चोचीच्या टोकाला पिवळा रंग असतो.चोचीच्या बुडाशी कपाळाच्या दोन्ही बाजूंना असलेले दोन पिवळे-नारिंगी ठिपके हे या बदकाचे वैशिष्ट्य मानले जाते आणि त्यावरूनच त्याची सहज ओळख पटते.

4 / 5
जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोबर हा या बदकांच्या विणीचा काळ असतो.तळी,नद्या आणि सरोवरे हे त्यांचे प्रमुख अधिवास आहेत. पावसाळ्यात जलाशय पाण्याने भरल्यानंतर त्यांचा वावर अधिक प्रमाणात दिसून येतो.कृष्णा नदीच्या पात्रात या बदकांचा मुक्त संचार दिसून आल्याने परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे सुंदर दर्शन घडत असून, हा नयनरम्य क्षण अनेकांनी  कॅमेऱ्यात टिपला आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु