Photo Gallery : आगीच्या दुर्घटनेत शेतकऱ्याचा संसार उध्वस्त, शेती साहित्यही जळून खाक
बुलडाणा : प्रतिकूल परस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट तर होतच आहे पण अधिकचा खर्चही होत आहे. हे कमी म्हणून की काय जिल्ह्यातील बोडखा येथील शेतकऱ्याच्या घराला आणि लगतच असलेल्या गोडाऊनला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये संसारउपयोगी साहित्याची तर होळी झाली आहेच पण अधिकचा दर मिळावा म्हणून पुरुषोत्तम हागे यांनी शेतीमालाची साठवणूक केली होती. या दुर्घटनेत शेतीमालाचीही राखरांगोळी झालेली आहे. गावाला लागूनच हागे यांचे शेत आणि घर असल्याने ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, भर दुपारी आग लागल्याने अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले होते. यामुळे अवघ्या काही वेळातच सर्वकाही होत्याचं नव्हतं झालं होतं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटाची ऑफर
दुसऱ्या लग्नानंतर समंथा 'या' देशात गेली हनिमूनला
10 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या CNG कार कोणत्या
दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड, आता काय?
डायबिटीजची दुश्मन आहेत ही 5 भरडधान्य, पाहा कोणती ?
थंडीत अक्रोड खाणं आरोग्यास किती लाभदायक? जाणून घ्या फायदे
