Immunity Boost: थंडीच्या दिवसात मुलांना द्या ‘हे’ पदार्थ, वाढेल रोगप्रतिकारक शक्ती

भीमराव गवळी, Tv9 मराठी

|

Updated on: Nov 15, 2022 | 11:44 AM

Nov 15, 2022 | 11:44 AM
मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलं लवकर आजारी पडतात, त्याचे कारण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे. थंडीच्या दिवसांत तुमच्या मुलांना नेहमी सर्दी-खोकल्याचा त्रास सहन करावा लागत असेल तर त्यांची प्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे समजावे. काही पदार्थ त्यांना खायला दिल्यास त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.

1 / 5
रताळं - हे एक असं सुपरफूड आहे ज्यामध्ये फायबर, पोटॅशिअम आणि अनेक व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. रताळं हे हेल्दी तर असतंच पण ते चविष्टही असतं. तुम्ही रताळं उकडून किंवा भाजून त्याचे सेवन करू शकता.

2 / 5
गूळ - साखरेविना आजकाल काहीही खाणे शक्य नाही, मात्र साखर अति खाल्यास मुलं आजारी पडू शकतात. अशा वेळी तुम्ही त्यांना गूळ खायला देऊ शकता. गुळामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन बी 12, बी6, कॅल्शिअम, लोह आणि इतर मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

3 / 5
आवळा - रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी चे सेवन करणे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही मुलांच्या आहारात आवळ्याचा समावेश करू शकता. कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त इतर अँटी-ऑक्सीडेंट्सही भरपूर प्रमाणात असतात.

4 / 5
खजूर -  रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच दाह कमी करण्यासाठीही खजूर प्रभावी ठरतो. खजूर हे एक सुपरफूड आहे जे कोणीही कधीही खाऊ शकते. त्यामुळे तुम्ही मुलांच्या आहारात खजुराचा समावेश करू शकता. तो तुपासोबत खाऊ शकतो.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI