Happy Birthday Rinku Rajguru | ‘सैराट’मुळे रातोरात स्टार झाली होती रिंकू राजगुरू, शाळेत जातानाही सोबत असायचे बॉडीगार्ड!

2016मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाने अफाट प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली होती. चित्रपटातील प्रत्येक पात्र अजरामर झाले. या चित्रपटातील ‘आर्ची’ अर्थात मुख्य नायिका रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिला या चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धी मिळाली.

1/6
2016मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाने अफाट प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाने प्रेक्षकांवर अक्षरशः जादू केली होती. चित्रपटातील प्रत्येक पात्र अजरामर झाले. या चित्रपटातील ‘आर्ची’ अर्थात मुख्य नायिका रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हिला या चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातून अभिनेत्रीने असे नाव कमावले की, आज तिला या चित्रपटासाठी विशेष ओळखले जाते. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आर्ची आणि परश्या या जोडीने सर्वांच्या हृदयावर राज्य केले. रिंकू राजगुरूने सिनेमाच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. इतकेच नाही तर अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
2/6
रिंकू राजगुरू आज (3 जून) आपला 20 वाढदिवस साजरा करते आहे. तिचा जन्म 3 जून 2001 रोजी महाराष्ट्रातील अकलूज शहरात झाला होता.
3/6
2013 मध्ये तिने सैराट चित्रपटासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भेट घेत, ऑडीशन दिली होती. त्यानंतर तिने या चित्रपटासाठी तब्बल 3 वर्षे प्रशिक्षण दिले आणि 2016 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.
4/6
या चित्रपटाच्या रिलीजनंतर ती संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली आणि घराबाहेर जाण्यासाठी तिला चक्क अंगरक्षकांची मदत घ्यावी लागली.
5/6
त्यावेळी रिंकूचे शालेय शिक्षण सुरु होते. चित्रपटानंतर ती केवळ परीक्षा देण्यापुरतीच शाळेत जायची. परीक्षा द्यायला जाण्यासाठी देखील तिला बॉडीगार्डची मदत घ्यावी लागत होती.
6/6
‘सैराट’ हा पहिला असा मराठी चित्रपट होता, ज्याच्या कलाकारांना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. रिंकू अनेकदा तिची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या सगळ्या फोटोंवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट करतात.