Photo: ‘हॅप्पी बर्थ डे’, ‘सीरियल किसर’ ते ‘फॅमिली मॅन’; वाचा, इम्रान हाश्मीची फिल्मी जर्नी!

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आज आपला 42वा वाढदिवस साजरा करत आहेत. इमरानने आपल्या करिअरची सुरुवात ‘फुटपाथ’ या चित्रपटाने केली होती. मात्र, ‘मर्डर’ आणि ‘गँगस्टर’सारख्या चित्रपटांमुळे तो लोकप्रिय झाला. ('Happy Birthday', 'Serial Kisser' to 'Family Man'; Read, Imran Hashmi's Film Journey!)

| Updated on: Mar 24, 2021 | 2:17 PM
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी आज आपला 42वा वाढदिवस साजरा करत आहेत. इमरानने आपल्या करिअरची सुरुवात ‘फुटपाथ’ या चित्रपटाने केली होती. मात्र, ‘मर्डर’ आणि ‘गँगस्टर’सारख्या चित्रपटांमुळे तो लोकप्रिय झाला.

1 / 6
इमरानला बॉलिवूडमध्ये ‘सिरियल किसर’ म्हणून ओळखले जाते. परंतु, खऱ्या आयुष्यात इमरान आपल्या ऑनस्क्रीन प्रतिमेच्या अगदी विरुद्ध आहे. इमरान एक परिपूर्ण कौटुंबिक व्यक्ती आहे.

2 / 6
इमरानच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल प्रत्येकाला माहिती आहे, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणालाही फारसे माहिती नाही. आज त्याच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने आपण त्याची आणि पत्नी परवीनच्या प्रेमकथेविषयी जाणून घेऊया.. इमरान आणि परवीन दोघेही शाळा व महाविद्यालयात एकत्र होते. आधी दोघे एकमेकांचे मित्र बनले आणि मग दोघांची ही मैत्री पुढे प्रेमात बदलली. जवळपास 6 वर्षांच्या नात्यानंतर इमरान आणि परवीनने लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी इमरान आपल्या करिअरमध्ये व्यस्त होता आणि त्यानंतर दोघांनी 2006मध्ये लग्न केले.

3 / 6
इमरानचे किसिंग आणि बोल्ड सीन पाहून सुरुवातीला परवीन थोडी नाराज झाली होती, पण नंतर तिला समजले की हा इमरानच्या कामाचा एक भाग आहे. करण जोहरच्या शो कॉफी विथ करणमध्ये इमरानने सांगितले होते की, जेव्हा परवीनने मर्डर चित्रपटात इमरान आणि मल्लिका शेरावतचे बोल्ड दृश्य पाहिले, तेव्हा तिने रागाने इमरानचा हात इतक्या जोराने धरला की, तिचे नखे इमरानच्या हातात रुतली. इमरानच्या हाताला रक्तस्त्राव होऊ लागला. ती चिडून म्हणाली, तू काय करतोस हे? मला याबद्दल आधी काहीही का सांगितले नाही? मात्र, त्यानंतर तिने समजून घेतले.

4 / 6
यानंतर इम्रानने सांगितले की, त्याने आपल्या पत्नीशी करार केला आहे की जेव्हा जेव्हा आपण चित्रपटात किसिंग सीन किंवा बोल्ड सीन देईल, तेव्हा तो पत्नीला महागडी भेटवस्तू देईल. अशाप्रकारे परवीनकडे आता अनेक महागड्या बॅग आहेत. परवीनने इमरानला खूप साथ दिली आहे. इतकेच नाही, तर दोघांनीही एकत्र राहून प्रत्येक कठीण प्रसंगावर मात केली आहे.

5 / 6
अलीकडे एका मुलाखतीदरम्यान इमरानला विचारले गेले होते की, तो आपल्या पत्नीशी चित्रपटांबद्दल बोलतो का?, तर अभिनेता म्हणाला, ‘हो, जेव्हा जेव्हा मी स्क्रिप्ट वाचतो तेव्हा मी परवीनचा दृष्टिकोनही विचारात घेतो. पण, मी हे कधीच विचारत नाही की, तो केला पाहिजे की नाही? चित्रपट करायचा की, नाही हा सर्वस्वी माझा निर्णय असतो.’

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.