होंडाने जापान मोबिलिटी शो 2025 मध्ये आपले सर्व कार्ड्स समोर मांडले आहेत. त्यांनी आता ऑल-इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट्स सादर केली आहे. त्यांचे अनेक प्रोडेक्ट्स पुढच्या काही वर्षात लॉन्च होणार आहेत. आता त्यांनी एक इलेक्ट्रिक व्हीकल कॉन्सेप्ट सादर केलीय. त्याचं प्रोडक्शन मॉडल 2026 मध्ये लॉन्च होईल. होंडा सुपर वन प्रोटोटाइप टोक्योमध्ये जागतिक स्तरावर सादर करण्यात आलं. सामान्य जनतेसाठी बनवलेली एक कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक व्हीकल आहे.
1 / 5
होंडा सुपर वन प्रोटोटाइप एक कॉम्पॅक्ट शेप आणि बॉक्सी सिल्हूटसोबत येते. याच्या पुढच्या भागात एक बंद काळ्या पॅनलवर गोल एलईडी हेडलॅम्प लावलेले आहेत.खाली फ्रंट बम्पर आहे.
2 / 5
सुपर वन प्रोटोटाइप पूर्णपणे इलेक्ट्रिक हॉट हॅचबॅक आहे. हलक्या वज़नाच्या एन सीरीज़ प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आलं आहे. स्पोर्टी ड्रायविंग डायनामिक्स आहे. ही एन-वन इलेक्ट्रिक केई कारवर आधारित बेस्ड एक फ्यूचरिस्टिक कॉन्सेप्ट मॉडल आहे. यात एक बॉडी किट लावण्यात आली आहे.
3 / 5
प्रोटोटाइपचा इंटीरियर ड्रायवर-बेस्ड लेआउटमध्ये येतो. यात निळ्या रंगाचा एक्सेंट स्टीयरिंग व्हील ट्रिम आणि डॅशबोर्ड दिसतो. सेंट्रल एसी वेंट्स दरम्यानचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट डिस्प्लेस लेयर्ड डिज़ाइन येते.
4 / 5
होंडाने सुपर वनला एका विशेष बूस्ट मोड सुद्धा दिला आहे. हे फीचर एका सिम्युलेटेड 7-स्पीड गियरबॉक्ससोबत काम करतं. जेणेकरुन गियर बदलतेवेळी ICE-बेस्ड कारच्या पावर बँड सारखं वाटावं. प्रोटोटाइपमध्ये एक एक्टिव साऊंड कंट्रोल सिस्टिम सुद्धा आहे. केबिनच्या आता वर्चुअल इंजन साउंड जनरेट होतो.