AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुत्रे अंगावर धावून येतात? फक्त या टिप्स वाचवू शकतात तुमचा जीव, पळालात तर…

रात्री घरी जाताना किंवा रस्त्यावरुन चालताना अनेकदा कुत्रे अचानक अंगावर येतात, भुंकायला लागतात. भीतीपोटी आपण पळायला लागतो आणि कुत्रे आपला पाठलाग करतात. पण, कुत्र्यांच्या हल्ल्यातून बचावण्यासाठी काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

Updated on: Jul 05, 2025 | 4:52 PM
Share
रात्री अनेकदा घरी जाताना किंवा रस्त्यावरुन चालताना कुत्रे अचानक अंगावर येतात. काही वेळा ते जोरजोरात भुंकायला लागतात. अशावेळी भीतीपोटी आपण पळायला लागतो. ज्यामुळे कुत्रेही तुमचा पाठलाग करण्यास सुरुवात करतात.

1 / 12
कुत्रे पाठीमागे लागल्यावर काय करावे, त्यांच्या हल्ल्यातून आपला बचाव कसा करावा असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. पण आज आम्ही तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे कुत्र्यांपासून नक्कीच सरंक्षण होईल.

2 / 12
जर कुत्रे तुमच्या अंगावर धावत असतील आणि भुंकत असतील, तर शांत राहा. हळू चाला. कुत्रे तुमच्या हालचालींमुळे अधिक आक्रमक होतात. त्यामुळे, अशा वेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही घाबरले आहात किंवा त्यांना आक्रमक वाटेल, असे वर्तन टाळा. तुम्ही शांत राहिलात तर ते भुंकत नाहीत.

3 / 12
कुत्रे भुंकायला लागल्यानंतर अजिबात पळू नका. जेव्हा तुम्ही कुत्र्‍यांपासून पळता, तेव्हा त्यांना तुम्ही आक्रमक झाल्यासारखे वाटता. तसेच  तुम्ही त्यांच्यापासून पळून जात आहात असे त्यांना वाटते. यामुळे ते अधिक वेगाने तुमच्यामागे धावू लागतील.

4 / 12
जर कुत्रे तुमच्या दिशेने धावत असतील, तर हळू चालत राहा. शक्य असल्यास, काही सेकंद थांबा आणि शांत राहा. यामुळे त्या कुत्र्‍यांना तुमच्यापासून काहीही धोका नाही, याची खात्री पटेल. त्यानंतर ते शांत होतील.

5 / 12
जेव्हा कुत्रे तुमच्या अंगावर भुंकतात किंवा धावतात त्यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन हळूहळू चालत राहा. यामुळे ते तुमचा पाठलाग करण्याची शक्यता कमी होते. जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले, तर तुम्ही त्यांना चॅलेंज दिले असे वाटते. त्यामुळे ते अंगावर येतात.

6 / 12
गाडी चालवताना कुत्रे मागे लागल्यास गाडीचा वेग वाढवण्याची चूक अजिबात करू नका. यामुळे कुत्रे तुमच्यावर झडप घालू शकतात. त्यामुळे कुत्रे गाडीच्या मागे लागत असतील तर गाडीचा वेग नियंत्रणात ठेवा.

7 / 12
जशी तुम्हाला कुत्र्यांची भीती वाटते, तशीच त्यांनाही तुमची भीती वाटते. त्यामुळे जेव्हा कुत्रे तुमच्या अंगावर धावून येतील किंवा भुंकतील अशावेळी त्यांच्या नजरेला नजर द्या. ज्यामुळे ते शांत होतात. काही कुत्रे यानंतर त्यांचा आक्रमकपणा कमी करतात.

8 / 12
कुत्र्‍यांवर अजिबात ओरडू नका किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे त्यांना वाटेल की तुम्ही आक्रमक आहात आणि स्वतःच्या संरक्षणासाठी ते तुमच्यावर हल्ला करू शकतात. त्याऐवजी, कुत्र्याला प्रेमाने हाक मारा.

9 / 12
जर कुत्रा तुमच्यावर भुंकत असेल तर अशावेळी तुमचा हात पुढे करा. त्यांना गोंजारु नका. फक्त हात पुढे करुन त्यांना वास घेऊ द्या. यामुळे तुमचा हेतू शांत आहे, हे त्यांना समजते आणि ते आक्रमक होत नाहीत.

10 / 12
जर कुत्रे खूप जवळ येत असतील, तर एखादा मोठा आवाज करा. जोरजोरात ओरडू नका. त्याऐवजी मोठा आवाज करा. यामुळे ते दचकून मागे सरकू शकतात.

11 / 12
 तसेच जर परिस्थिती गंभीर वाटत असेल, तर मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांकडे मदत मागा. तसेच कुत्रा चावल्यास आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घ्या.

12 / 12
मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण
मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण.
आव्हाडांना धमकी, काय म्हणाले शशिकांत शिंदे
आव्हाडांना धमकी, काय म्हणाले शशिकांत शिंदे.
हल्ल्यासाठी गुंड विधानभवनात आणले; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
हल्ल्यासाठी गुंड विधानभवनात आणले; वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा.
..तो आमदार खुणावतो अन् मारहाण सुरू होते, आव्हाडांचा रोख नेमका कोणावर?
..तो आमदार खुणावतो अन् मारहाण सुरू होते, आव्हाडांचा रोख नेमका कोणावर?.
भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं, विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण
भास्कर जाधवांना हातवारे करणं भोवलं, विधान भवनाच्या पायऱ्यांवर लोटांगण.
Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले
Padalkar : तुम्हाला जमत नसेल तर मी बोलत नाही, पडळकर भरसभागृहात भडकले.
एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'
एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, 'विधान भवनाचं पावित्र्य ...'.
भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?
भास्कर जाधवांवर का आली सभागृहात वारंवार माफी मागण्याची वेळ?.
आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या अन्..
आव्हाडांच्या मुलीला पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या अन्...
राड्यानंतर मविआचे नेते राज्यपालांच्या भेटीला
राड्यानंतर मविआचे नेते राज्यपालांच्या भेटीला.