PHOTO | आई करिना कपूरकडून तैमुरला मातीची भांडी बनवण्याचे प्रशिक्षण, पाहा त्यांचे धमाल फोटो!

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर, तैमुर आणि सैफ अली खानसह धर्मशाला येथे धमाल मस्ती करत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:25 PM, 25 Nov 2020
बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर, तैमुर आणि सैफ अली खानसह धर्मशाला येथे धमाल मस्ती करत आहे. सैफ त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी धर्मशाला येथे आला आहे.
सैफ चित्रीकरणात व्यस्त असला तरी, करिना आणि तैमुर मात्र त्यांच्या या ट्रीपचा आनंद घेत आहेत. नुकतेच करिनाने तिचे आणि तैमुरचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
करिनाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती तैमुरला मातीची भांडी बनवण्याचे शिकवताना दिसत आहे. ‘पॉट, पॉट, पॉटरी विथ द लिटल मॅन. धर्मकोट स्टूडियो’, असे कॅप्शन देत हे फोटो पोस्ट केले आहेत.
आईच्या सांगण्यानुसार तैमुर आपल्या चिमुकल्या हातांनी मातीच्या भांड्याला आकार देताना दिसत आहे. या कामासोबतच तैमुरने फोटोंसाठी खास पोझ दिल्या आहेत.
करिना आणि तैमुरचे हे क्युट फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. काही दिवसांपूर्वी धर्मशाला येथे फिरतानाच व्हिडीओ व्हायरल झाला होता.