Travel Special: अरुणाचल प्रदेशमधील इटानगर पर्यटनासाठी खास, जाणून घ्या येथील सर्वोत्तम ठिकाणे!

जर तुम्हाला खरोखर पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरला नक्की भेट द्यावी. इटानगर हे एक नैसर्गिक नंदनवन आहे. येथे तुम्हाला पुरातन वारसा आणि आदिवासी संस्कृती बघायला मिळेल. चला तर मग इटानगरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे जाणून घेऊयात.

Jan 28, 2022 | 9:58 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 28, 2022 | 9:58 AM

जर तुम्हाला खरोखर पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरला नक्की भेट द्यावी. इटानगर हे एक नैसर्गिक नंदनवन आहे. येथे तुम्हाला पुरातन वारसा आणि आदिवासी संस्कृती बघायला मिळेल. चला तर मग इटानगरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे जाणून घेऊयात.

जर तुम्हाला खरोखर पर्यटनाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरला नक्की भेट द्यावी. इटानगर हे एक नैसर्गिक नंदनवन आहे. येथे तुम्हाला पुरातन वारसा आणि आदिवासी संस्कृती बघायला मिळेल. चला तर मग इटानगरला भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे जाणून घेऊयात.

1 / 5
इटानगरला भेट देण्यासाठी नमदाफा नॅशनल पार्क हे सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. वन्यजीव आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण एखाद्या खास भेटवस्तूपेक्षा कमी नाही. नमदाफा राष्ट्रीय उद्यान 1,985 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात व्यापलेले आहे आणि विशेष म्हणजे हे भारतातील तिसरे मोठे राष्ट्रीय उद्यान आहे.

2 / 5
इटानगरमधील वन्यजीव अभयारण्य देखील खास आहे. हे ठिकाण वन्यजीव आणि निसर्गप्रेमींसाठी खास ठिकाणांपैकी एक आहे. वन्यजीव अभयारण्य सुमारे 140 चौरस किमी परिसरात पसरलेले आहे, ज्यामध्ये वाघ, हत्ती, बिबट्या आणि अस्वल यांसारख्या वन्यजीव प्रजाती आहेत.

3 / 5
इटानगरपासून सुमारे 20 किमी अंतरावर टेंगा नदीच्या काठावर वसलेले, “रुपा” हे खास ठिकाण आहे. हे राज्यातील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. जर तुम्ही इटानगरला गेलात तर रुपाला नक्की जा.

4 / 5
इटा किल्ला हे इटानगरच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. जर तुम्हाला इटानगरचा इतिहास जाणून घ्यायची इच्छा असेल तर इथे नक्की जा. हा किल्ला एका टेकडीच्या माथ्यावर वसलेला आहे. इटा किल्ल्याची वेळ सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 पर्यंत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें