AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नक्की काय घडलंय, काय घडतंय हे सांगायचं… राज ठाकरे काय बॉम्ब टाकणार?, त्या पोस्टरमध्ये काय म्हटलंय?

येत्या 9 एप्रिल रोजी मराठी नववर्ष दिनी संध्याकाळी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेने गुढी पाडवा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

| Updated on: Apr 04, 2024 | 10:08 AM
Share
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार घोषित केले, पण मनसेने अद्याप एकही उमेदवार घोषित केला नाही. त्यामुळे मनसे निवडणूक लढवणार की नाही याबाबतची साशंकता निर्माण झालेली आहे. मात्र, या सर्वांची प्रश्न उत्तरं येत्या 9 एप्रिल रोजी मिळणार आहेत. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार असून सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.

1 / 6
मध्यंतरी राज ठाकरे दिल्लीत जाऊन भाजप नेते अमित शाह यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा झाली. नंतर मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी राज यांची चर्चा झाली. त्यानंतर राज ठाकरे पुन्हा राजकीय चर्चांमध्ये दिसले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्याबद्दलचा सस्पेन्स वाढलेला असतानाच मनसेचा गुढी पाडव्याचा टीझर लॉन्च झाला आहे. त्यातून एक सूचक विधान करण्यात आलं.

2 / 6
मनसेने गुढी पाडवा मेळाव्याचा टीझर लॉन्च केला आहे. तसेच गुढी पाडवा मेळाव्याच्या पोस्ट्स सोशल मीडियावरही व्हायरल झाल्या आहेत. राजकारणाची झाली दशा, राजविचार दाखवणार महाराष्ट्राला दिशा, असं मनसेने लाँच केलेल्या टीझरमध्ये म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्रालाच नव्हे तर राजकारणालाही नवनिर्माणाची गरज असल्याचंही त्यामध्ये म्हटलं आहे.

3 / 6
वक्ता एक...लक्ष-लक्ष श्रोते! नवनिर्माणाची गुढी उभारू... येताय ना! 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय हे सांगायचं आहे... अशी मनसेची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

4 / 6
येत्या 9 एप्रिल रोजी मराठी नववर्ष दिन म्हणजे गुढी पाडवा आहे. संध्याकाळी 4 वाजता दादरच्या शिवाजी पार्कवर मनसेने गुढी पाडवा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

5 / 6
गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून राज ठाकरे 9 तारखेला कुणावर बरसतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसे लोकसभा निवडणूक लढणार की नाही? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे. त्याबाबतही राज ठाकरे या मेळाव्यातून मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर मनसेचं लोकसभेबाबतचं राज्यातील चित्र स्पष्ट होईल.

6 / 6
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.