एकीकडे अवघा देश पावसाची वाट बघत असताना दुसरीकडे चक्रीवादळाचं संकट घोंघावतं आहे. याचा महाराष्ट्रावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
1 / 5
काल पहाटे अरबी महासागरात चक्रीवादळ निर्माण झालं आहे. याला Biporjoy Cyclone असं नाव देण्यात आलं आहे.
2 / 5
या चक्रीवादळाचा वेग 150 ते 190 किलोमीटर प्रतितास आहे. आज उद्या आणि परवा अरबी सागरात उंच लहरी निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम हा सर्वाधिक गुजरातवर पाहायला मिळेल.
3 / 5
Biporjoy या चक्रीवादळाचा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि गुजरातच्या किनाटपट्टीवर होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसाची शक्यता आहे.
4 / 5
गुजरातला अलर्ट देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका गुजरातला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. सरकारकडूनही तयारी सुरू करण्यात आली आहे.