AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : AL JAFZIA… मनोरी समुद्रात अनोळखी जहाज अचानक आलं; ना हालचाल, ना ओळख; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मुंबईतील गोराई-मनोरी किनाऱ्याजवळ 'AL JAFZIA' हे मालवाहू जहाज मुसळधार पाऊस आणि वादळी हवामानामुळे समुद्रात खडकांमध्ये अडकले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे जहाज तेथेच असून, तटरक्षक दल आणि पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. जहाजावरील कर्मचाऱ्यांची माहिती आणि घटनेमागील कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

| Updated on: Jul 07, 2026 | 10:22 AM
Share
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी हवामानाचा परिणाम समुद्रातही दिसून आला आहे. गोराई-मनोरी किनाऱ्याजवळील हिंदू स्मशानभूमीसमोरील समुद्रात, किनाऱ्यापासून सुमारे २०० ते २५० मीटर अंतरावर एक मालवाहू जहाज खडकांमध्ये अडकले आहे.

1 / 5
प्राथमिक माहितीनुसार, "AL JAFZIA" नावाचे हे कार्गो जहाज जोरदार पाऊस, उंच लाटा आणि वेगवान वाऱ्यांमुळे मार्ग भरकटून गोराई-मनोरी किनाऱ्याच्या दिशेने आले आणि खडकांमध्ये अडकले. गेल्या दोन दिवसांपासून जहाज तेथेच अडकून असून, त्यावर कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही. जहाजात किती कर्मचारी आहेत किंवा तेथे कोणी उपस्थित आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

2 / 5
घटनेची माहिती मिळताच गोराई पोलीस, भारतीय तटरक्षक दल आणि इतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, खराब हवामान, मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे जहाजापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. सध्या भारतीय तटरक्षक दलाच्या देखरेखीखाली जहाजावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, मनोरी परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

3 / 5
या प्रकरणी भारतीय तटरक्षक दलाने येलो गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गु.र.क्र. ६०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८७, ३(५), ६१, ३१८, ३३६, ३४० तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

4 / 5
"AL JAFZIA"  हे जहाज किनाऱ्यावर कसे पोहोचले, त्यामागील नेमके कारण काय आहे आणि जहाजावरील कर्मचाऱ्यांबाबतची माहिती मिळवण्यासाठी पोलीस आणि तटरक्षक दलाकडून पुढील तपास सुरू आहे. गोराई पोलिसांनी तटरक्षक दलासह सर्व संबंधित यंत्रणांना  माहिती दिली. जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी मनोरी येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ