Nagar Panchayat Election : कर्जतच्या विजयासाठी रोहित पवारांकडून हटके स्टाईल प्रचार, बाजारपेठेत मतदारांशी बातचीत, थेट जनसंपर्कावर भर

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीसाठी (Karjat Nagar Panchayat) दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) तर भाजप नेते माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) असा सामना आहे.

Dec 17, 2021 | 8:33 AM
कुणाल जायकर

| Edited By: Yuvraj Jadhav

1 / 7
अहमदनगरला कर्जत येथील नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. रोहित पवारांनी कर्जतमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात थेट प्रचारसभाऐवजी भेटीगाठींवर जोर दिल्या. मतदारांशी थेट संपर्क साधण्याचं त्यांचं काम सुरु आहे.

2 / 7
अहमदनगरला कर्जत येथील नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहेय. रोहित पवार प्रचार सभा न घेता थेट बाजारात जाऊन व्यावसायिकांच्या गाठी भेटी घेत आहेत. तर अनेक ठिकाणी कापड दुकानात, रस्त्यावरील पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खातांना आस्वाद घेता घेता ते प्रचार करत आहेत.

3 / 7
रोहित पवार बाजारातील बाजीपाला विक्रेत्यांची भेट घेऊन ते चर्चा करताना दिसतात. विशेष म्हणजे प्रचार करतांना त्यांनी कुंभार गल्लीत स्वतः मातीचे मटके बनवण्याचा आनंद देखील घेतलाय.

4 / 7
तसेच प्रचारा दरम्यान लहान मुलांना देखीक चॉकलेटच वाटप रोहित पवार करताना दिसलं. एका सलूनच्या दुकानात कटिंग देखील त्यांनी केलीये. त्यांच्या या हटके प्रचाराची जोरदार चर्चा सध्या कर्जत शहरात सुरू आहे.  21 डिसेंबर रोजी कर्जत नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे.

5 / 7
दुसरीकडे राम शिंदे हे मागील 10 वर्ष या मतदारसंघाचे आमदार होते. तसेच भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते. मंत्री असताना केलेल्या विकास कामांमुळे जनता भाजपला बहुमत दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केलाय.

6 / 7
 रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात विधानसभेनंतर पुन्हा एकदा सामना होतोय. रोहित पवारांसाठी प्रतिष्ठेची तर राम शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची ठरणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें