Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसा एवढा की उंदीर खायाचे, किल्लाही बांधणार होता… या ड्रग्स तस्करची कहाणी माहीत आहे का?

एकेकाळी पाब्लोचं जगावर राज्य होतं. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. जगातील सातव्या क्रमांकाचा श्रीमंत म्हणून त्याची ख्याती होती. एवढा पैसा त्याने कुठून आणला होता? अर्थातच काळेधंदे करून त्याने ही माया जमवली होती. जगाच्या नजरेत तो कुविख्यात ड्रग्स स्मगलर होता, पण गरीबांसाठी तो मसीहा होता.... पाब्लो एस्कोबार खरंच कोण होता?

| Updated on: Feb 16, 2025 | 11:37 PM
पाब्लो एमिलियो एस्कोबार गैविरिया हा जगातील सर्वात मोठा ड्रग्स माफिया होता. त्याचा ड्रग्सचा धंदा जगभर पसरलेला होता. त्यामुळेच त्याला पकडण्यासाठी जगभरातील गुप्तचर संघटना त्याच्या मागावर होत्या. त्याचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्याचे वडील आबेल डी जीसस एस्कोबार हे शेतकरी होते. तर आई प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. त्याच्या घरात त्याकाळी वीजही नसायची.

1 / 8
पाब्लो एक्सोबार कोलंबियातील ड्रग्स माफिया होताच, त्याशिवाय तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीही होता. 1989मध्ये फोर्ब्सने त्याला जगातील सातवा सर्वात श्रीमंत म्हणून घोषित केलं होतं. त्याची अंदाजित संपत्ती 30 बिलियन डॉलर म्हणजे 16 खरब रुपये होती. त्याच्याकडे अनेक लग्जरी गाड्या आणि घरे होती. त्याला एन्काऊंटरमध्ये मारण्यात आलं.

2 / 8
पाब्लोचा भाऊ रॉबर्टा एस्कोबारचं पुस्तक 'द एकाउंट्स स्टोरी'नुसार पाब्लो एका दिवसात 15 टन कोकीनची तस्करी करायचा.पाब्लोच्या भावाच्या दाव्यानुसार पाब्लोचा वार्षिक नफा 126988 कोटी रुपये होता. एका गोदामात तो हा पैसा ठेवायचा. या गोदामात एवढा पैसा होता की उंदीर त्याच्या नोटा खाऊन टाकायचे. बऱ्याच नोटा तर पाणी लागल्याने खराब व्हायच्या. तर तर नोटा बांधण्यासाठी जे रबर बँड लागायचे, त्याच्यावरच तो दर महिन्याला 1 लाख 67 हजार रुपये म्हणजे 2500 डॉलर खर्च करायचा.

3 / 8
1986मध्ये त्याने कोलंबियाच्या राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने देशावरील 10 बिलियन डॉलर म्हणजे 5.4 खरब रुपयाचं राष्ट्रीय कर्ज फेडण्याचा प्रस्तावही दिला होता.

4 / 8
तो कोलंबियन सरकार आणि अमेरिकेचा सर्वात मोठा दुश्मन होता. पाब्लोला गरीबांचा मसीहा म्हटला जायचं. त्याने अनेक चर्च बांधले होते. रोमन कॅथलिक समाजात तो प्रचंड लोकप्रिय होता. रॉबिन हुड अशी इमेज तयार करण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली.

5 / 8
 1976 मध्ये त्याने 26व्या वर्षी 15 वर्षाच्या मारिया व्हिक्टोरिया हिच्याशी लग्न केलं होतं. त्याला जुआन पाब्लो आणि मॅन्युएला ही दोन मुले होती.

6 / 8
पाब्लोने 5000 एकरवर हैसियेंदा नॅपोलेस (नेपल्स इस्टेट) नावाचे अलिशान स्टेट तयार केले होते. त्याचं कुटुंब इथेच राहायचं. त्याचबरोबर त्याने ग्रीक शैलीचा एक किल्ला बांधण्याचं काम हाती घेतलं होतं. किल्ल्याचं बांधकामही सुरू झालं होतं. पण ते कधीच पूर्ण झालं नाही.

7 / 8
1990मध्ये सरकारने त्याचं खेत, पक्षीघर आणि किल्ला जप्त केला. तसेच एक्सटिंक्शन दे डोमिनो कायद्याच्याअंतर्गत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाला या सर्वांची मालकी देण्यात आली.

8 / 8
Follow us
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक
लोकलने आज प्रवास करताय? मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर असा असणार मेगाब्लॉक.
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल
देशात तणाव पसरवणंच त्यांच काम; संजय राऊतांचा हल्लाबोल.
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'
शिंदेंचे मंत्री जाहीरपणे म्हणाले, 'गुलाबराव पाटील गद्दार, पण जनतेनं..'.
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल
खोक्याच्या कुटुंबाला मारहाण; 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार ठरले, हे 3 उमेदवार जाहीर.
औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा
औरंगजेबाची कबर उध्वस्त होणार! विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा इशारा.
खोक्याचं घर जाळण्याची घाई का? धसांचा सवाल तर कराडचं जाळा, कोणाची मागणी
खोक्याचं घर जाळण्याची घाई का? धसांचा सवाल तर कराडचं जाळा, कोणाची मागणी.
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.