गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. पुण्यात वैष्णवी हगवणेच्या आत्महत्या प्रकरणानंतर अमरावती, पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे अशाच पद्धतीने सासरच्या, पतीच्या जाचाला कंटाळून महिलांनी आत्महत्या केली आहे.
1 / 5
असे असतानाच आता पुण्यात एक हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला तिच्या दोन चिमुकल्यांसह निर्घृण पद्धतीने मारण्यात आलंय.
2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पुण्यातील रांजणगाव येथे घडली आहे. येथे एका 25 वर्षीय महिलेची दोन चिमुकल्यांसह हत्या करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेहांची पाहणी केली आहे.
3 / 5
डोक्यात गंभीर जखमा करून हा खून करण्यात आलाय. तसेच मृतदेहावर पेट्रोल टाकून तो पेटवून देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. पण पाऊस असल्यामुळे मृतदेह अर्धवट जळाला आहे.
4 / 5
मृतदेह अर्धवट जळाल्यामुळे हत्या झालेली महिला नेमकी कोण आहे, हे शोधण्याचे तसेच मारेकऱ्याला शोधून काढण्याचे आव्हान रांजणगाव पोलिसांसमोर आहे.