महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी गावात दरड कोसळून अख्खं गाव उद्ध्वस्त झालं. या दुर्घटनेत जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 40 मृतदेह काढण्यात आली आहे. अजून अनेक मृतदेह ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.
Jul 24, 2021 | 3:02 PM
महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी गावात दरड कोसळून अख्खं गाव उद्ध्वस्त झालं. या दुर्घटनेत जवळपास 35 घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 40 मृतदेह काढण्यात आली आहे. अजून अनेक मृतदेह ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तळीये गावात जात परिस्थितीची पाहणी केली.
1 / 6
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबच खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
2 / 6
यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. नेमकी दुर्घटना कशी झाली याची सविस्तर माहिती मुख्यमंत्री महोदयांनी घेतली. मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलाय.
3 / 6
अनेकांची घरं, संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांनी आपले घराती व्यक्ती, नातेवाईकांना गमावलं आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना स्वत:ला सावरा आणि सर्व जबाबदारी आता शासनावर टाका, अशा शब्दात धीर दिला आहे.
4 / 6
दरम्यान, घरं, घरातील साहित्य नष्ट झाल्यामुळे स्थानिकांना त्यांची सर्व कागदपत्रे, आर्थिक मदत वेळेवर उपलब्ध करुन दिली जातील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
5 / 6
अशा घटनांमधून आता आपल्याला शिकावं लागेल. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासोबतच, डोंगराखाली, धोकादायक ठिकाणी असलेल्या वस्त्यांचं अन्य सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.