‘आई कुठे काय करते’मध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री; 6 वर्षांनंतर मालिकेत कमबॅक

'आई कुठे काय करते' ही मालिका सोमवार ते शनिवार दुपारी 2.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत नव्या व्यक्तीरेखेची एण्ट्री झाल्यानंतर कथानकात रंजक वळण येणार आहे. ऋषी सक्सेनाचा चाहतावर्ग मोठा असल्याने प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

| Updated on: Jun 05, 2024 | 4:48 PM
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'मध्ये लवकरच सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची एण्ट्री होणार आहे. ऋषीला याआधी प्रेक्षकांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये पाहिलंय. त्याने चित्रपटातही काम केलंय. तब्बल सहा वर्षांनंतर ऋषी मराठी टेलिव्हिजन विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे.

1 / 5
'आई कुठे काय करते' मालिकेत मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा तो साकारताना दिसेल. मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. त्याची आई अरुंधतीची खूप मोठी चाहती होती. आपल्या मुलाने अरुंधतीकडून गाणं शिकावं ही तिची इच्छा होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिहीर अरुंधतीकडून गाण्याचे धडे गिरवणार आहे.

2 / 5
या भूमिकेविषयी सांगताना ऋषी म्हणाला, "स्टार प्रवाह वाहिनीसोबत काम करण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. अखेर ती इच्छा पूर्ण होतेय. आई कुठे काय करते ही मालिका माझीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे.  आपल्या आवडीच्या मालिकेत काम करायला मिळणं हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग आहे."

3 / 5
"खरंतर खूप दिवसांपासून मराठी मालिकेत कधी दिसणार अशी विचारणा होत होती. मी चांगल्या भूमिकेच्या शोधात होतो. 'आई कुठे काय करते' मालिकेतल्या मिहीर या व्यक्तिरेखेसाठी मला विचारण्यात आलं आणि मला ही व्यक्तिरेखा खूपच भावली," असं त्याने सांगितलं.

4 / 5
कमबॅकविषयी ऋषी म्हणाला, "जवळपास सहा वर्षांनंतर मी मराठी मालिकेत काम करतोय. शूटिंगच्या पहिल्या दिवशी थोडं टेन्शन होतं. मात्र सेटवर सगळ्यांनीच मला आपलसं करुन घेतलं. आजवर प्रेक्षकांनी माझ्या प्रत्येक भूमिकेला भरभरुन प्रेम दिलं आहे. हेच प्रेम या नव्या भूमिकेलाही देतील याची खात्री आहे."

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.