AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राच्या दादा-वहिनीची कमाल! ‘वेड’ला एक-दोन नव्हे तर मिळाले तब्बल इतके पुरस्कार

रितेशचा ‘वेड’ हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मजिली’ या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तर जिनिलिया देशमुखने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. मूळ तेलुगू चित्रपटात समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

| Updated on: Jan 20, 2024 | 9:16 AM
Share
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ या चित्रपटाने अख्ख्या महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. थिएटरमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यानंतर आता या चित्रपटाने पुरस्कार सोहळ्यांमध्येही आपलं वर्चस्व गाजवलं आहे.

1 / 5
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'वेड' या चित्रपटाला 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' या पुरस्कार सोहळ्यात एक-दोन नव्हे तर तब्बल नऊ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रितेश आणि जिनिलियाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे.

2 / 5
सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गायिका, पॉप्युलर फेस ऑफ इअर, स्टाइल आयकॉन ऑफ द इअर या विभागांमध्ये 'वेड'च्या टीमने पुरस्कार पटकावले आहेत.

3 / 5
यापैकी रितेशने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि स्टाइल आयकॉन ऑफ द इअर या पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. तर जिनिलियाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि पॉप्युलर फेस ऑफ इअरचा पुरस्कार पटकावला आहे. चित्रपटातील 'सुख कळले' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. 'वेड तुझा' या गाण्यासाठी अजय-अतुल या जोडीगोळीला सर्वोत्कृष्ट गायनाचा पुरस्कार मिळाला आहे.

4 / 5
'वेड' चित्रपटातील 'सुख कळले' या गाण्यासाठी श्रेया घोषालने सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. या पुरस्कारांबद्दल जिनिलिया आणि रितेशने चाहत्यांचे आभार मानले आहेत. वेडची कथा, गाणी, संवाद, कलाकारांचं अभिनय हे प्रेक्षकांना खूप भावलं होतं. रितेश-जिनिलियाच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.