AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कमळी’मध्ये लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एण्ट्री; शिक्षण व्यवस्थेला हादरा देणारा ‘रितेश सरपोतदार’

रितेश सरपोतदारच्या आगमनानंतर कमळीच्या आयुष्यात कोणतं नवं वादळ येणार? तिची प्रामाणिकता आणि जिद्द या नव्या आव्हानासमोर टिकून राहील का? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या व्यवस्थेविरोधात कमळी कशी उभी राहणार, या सर्वांची उत्तरं प्रेक्षकांनी 'कमळी' मालिकेच्या आगामी भागात मिळू शकेल. ही मालिका दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

| Updated on: Jul 31, 2026 | 9:13 AM
Share
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'कमळी' ही नेहमीच प्रेक्षकांच्या आयुष्यातील वास्तवाशी जोडलेले विषय आपल्या कथानकातून मांडत आली आहे. यावेळीही मालिका, विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही जवळचा वाटणारा शिक्षण व्यवस्था आणि त्यामधील वाढता व्यावसायिक दृष्टिकोन हा महत्त्वाचा विषय हाताळणार आहे. या कथानकाला अधिक प्रभावी बनवण्यासाठी मालिकेत एका दमदार नव्या पात्राची एन्ट्री होणार असून, प्रेक्षकांचा लाडका अभिनेता शशांक केतकर ‘रितेश सरपोतदार’ ही प्रभावी भूमिका साकारणार आहे.

1 / 5
या नव्या भूमिकेविषयी बोलताना शशांक केतकर म्हणाला, "सर्वप्रथम झी मराठीवर पुन्हा परतताना मला खूप आनंद होत आहे. सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या 'कमळी' सारख्या मालिकेचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी झी मराठी, निर्माते आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो."

2 / 5
"मला साकारायला मिळणारे 'रितेश सरपोतदार' हे पात्र खूप वेगळं आणि अनेक छटा असलेलं आहे. महाविद्यालय, शिक्षण, विद्यार्थी आणि पालक हे विषय माझ्या कायमच जवळचे राहिले आहेत. आजच्या काळात शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहणारी मानसिकता वाढताना दिसते. अशा लोकांसाठी विद्यार्थ्यांची स्वप्नं, पालकांचे कष्ट, त्यांचे पैसे किंवा भावना यांना काहीच किंमत नसते," असं शशांकने सांगितलं.

3 / 5
याविषयी तो पुढे म्हणाला, "'पैसे द्या आणि यश मिळवा' हीच त्यांची विचारसरणी असते. रितेश सरपोतदार असाच एक महत्त्वाकांक्षी आणि निर्दयी माणूस आहे. पण एक अभिनेता म्हणून मला त्याचा फक्त नकारात्मक पैलू साकारायचा नाही, तर तो असा का बनला, त्यामागची कारणं आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विविध छटा देखील दाखवायच्या आहेत."

4 / 5
"आतापर्यंत प्रेक्षकांनी कमळीची प्रामाणिकता, अभ्यासू वृत्ती आणि सचोटी पाहिली आहे. याच गुणांच्या बळावर ती अशा प्रभावशाली आणि स्वार्थी व्यक्तीला कसा सामना देते, हीच या पुढच्या प्रवासाची खरी मजा असेल. या वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेसाठी मी खूप उत्सुक आहे", अशा शब्दांत शशांक व्यक्त झाला.

5 / 5
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप

अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण

अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?

गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती