Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Social Media ला रामराम
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कायम तिच्या फिटनेस, आहार तसेच तिच्या शो आणि प्रोफेशनल लाईफशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता शिल्पाने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती कायम तिच्या फिटनेस, आहार तसेच तिच्या शो आणि प्रोफेशनल लाईफशी संबंधित अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. पण आता शिल्पाने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
1 / 4
पूर्णपणे ब्लॅक अशी एका इमेज शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. याबरोबरच शिल्पाने लिहिले की, 'अशाच गोष्टींचा कंटाळा आला आहे. सतत तेच तेच दिसत आहे. त्यामुळे जोपर्यंत मला नवीन अवतार मिळत नाही तोपर्यंत मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे.
2 / 4
चाहत्यांनी तिच्या या विचाराचा आदर केला आहे. अनेकांनी हार्टच्या इमोजी शेअर करत तिच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
3 / 4
नुकत्याच झालेल्या मदर्स डेच्या निमित्ताने शिल्पाने तिच्या दोन्ही मुलांसोबतचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तिची मुलगा व मुलगी तिचा मेकअप करताना दिसून येत आहे.