AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉरर-कॉमेडी चित्रपटानंतर श्रद्धा कपूर आता दिसणार अनोख्या भूमिकेत, काय आहे तिच्या ‘ईथा’ चित्रपटाची कथा?

श्रद्धा कपूर आता अशा भूमिकेत दिसणार आहे ज्याची चाहत्यांनी कधी कल्पना देखील केली नसेल. अभिनेत्रीच्या आगामी ईथा चित्रपटाची कथा नेमकी काय?

| Updated on: Jun 20, 2026 | 11:26 AM
Share
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून श्रद्धाचा हा नवा आणि दमदार अवतार पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

1 / 5
‘ईथा’ हा केवळ चरित्रपट नसून महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. चित्रपटात विठाबाईंचे संघर्षमय बालपण, आर्थिक अडचणी, सामाजिक बंधने आणि तमाशा-लावणी क्षेत्रातील त्यांची यशस्वी वाटचाल दाखवण्यात येणार आहे.

2 / 5
अत्यंत साध्या आणि गरीब कुटुंबात जन्मलेल्या विठाबाई यांनी लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी सांभाळत तमाशा आणि लावणीच्या मंचावर काम सुरू केले. आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्य, प्रभावी अभिनय आणि दमदार आवाजाच्या जोरावर त्यांनी लावणीला नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या सादरीकरणासाठी लोक दूरदूरून येत असत, त्यामुळे त्यांना ‘लावणी सम्राज्ञी’ ही उपाधी मिळाली.

3 / 5
त्या काळात तमाशा आणि लावणी कलाकारांकडे समाजाकडून कमीपणाने पाहिले जात होते. मात्र विठाबाई यांनी आपल्या कलेच्या बळावर समाजातील ही मानसिकता बदलण्याचे काम केले. अनेक संकटांवर मात करून त्यांनी लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.

4 / 5
चित्रपटातील भूमिका वास्तवदर्शी करण्यासाठी श्रद्धा कपूरने विशेष लावणी नृत्याचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे प्रेक्षकांना पहिल्यांदाच श्रद्धाचा एक वेगळा आणि आव्हानात्मक अभिनय पाहायला मिळणार आहे.

5 / 5
Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा...
ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणार? 2006 मधील दोन प्रकरणांची पुन्हा चौकशी
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक...
सहर शेख यांच्या ताजमहाल पोस्टने वाद पेटला; मुंब्र्यात भाजपचे आक्रमक आंदोलन!
सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील-पडळकर एकाच मंचावर
Sangli Padalkar Vs Patil : सांगली जिल्हा बँकेच्या निकालानंतर जयंत पाटील- गोपीचंद पडळकर एकाच मंचावर
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअप...
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली अपडेट! पुढील चेकअपसाठी ब्रीच कॅंडी रुग्णालयात
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले
ट्रम्प यांच्या पराभवावर बराक ओबामा यांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले, हा विजय...
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राज
ऊसाला 4200 रुपये दर द्या, अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद! राजू शेट्टींचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर