आता प्रश्न असा आहे, ते खेळाडू कोण आहेत? भारतापासून सुरुवात करायची झाली, तर पहिले नाव आहे पंकज सिंह यांचे. उजव्या हाताचे मध्यमगती गोलंदाज असलेल्या या खेळाडूने 2010 मध्येच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने श्रीलंकेविरुद्ध हरारे येथे आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला. पण त्या एका सामन्यानंतर तो पुढील 4 वर्षे गायब होता. चार वर्षांनंतर 2014 मध्ये त्याने कसोटी पदार्पण केले. त्याने इंग्लंडविरुद्ध साउथॅम्प्टन येथे पहिला कसोटी सामना खेळला. त्यानंतर इंग्लंडमध्येच मँचेस्टर येथे आणखी एक कसोटी सामना खेळला. पण, त्यानंतर त्याला पुन्हा कधी खेळण्याची संधी मिळाली नाही. म्हणजेच, फक्त 3 आंतरराष्ट्रीय सामने खेळून तो लापता झाला.