AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त जिद्द पाहिजे, 50 वेळा रिजेक्ट झालं गाणं लताजींमुळे ठरलं ब्लॉकबस्टर, ऐकताच प्रत्येकजण गुनगुनतो

स्वतःच्या कलेवर विश्वास असेल तर यश नक्कीच मिळतं. 50 वेळा नाकारण्यात आलेलं गाणं, जेव्हा लताजींनी गायलं अन् काही क्षणात ते ठरलं ब्लॉकबस्टर. चित्रपटाने जिंकले होते 3 राष्ट्रीय पुरस्कार.

| Updated on: Apr 12, 2026 | 10:39 AM
Share
भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीताचा इतिहास लता मंगेशकर या नावाशिवाय अपूर्णच मानला जातो. भारताची गानकोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता दीदींनी आपल्या कारकिर्दीत असंख्य अजरामर गाणी दिली. त्यांच्या आवाजातलं गाणं म्हणजे ते हमखास हिट ठरणार असं एकेकाळी समीकरणच बनलं होतं.

1 / 5
मात्र त्यांच्या कारकिर्दीत एक असं गाणं आहे, ज्यामागची कहाणी अत्यंत रंजक आहे. सुरुवातीला तब्बल 50 वेळा नाकारण्यात आलेली हीच चाल पुढे भारतीय संगीतसृष्टीत इतिहास घडवणारी ठरली आणि या गाण्यामुळे तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले.

2 / 5
ही गोष्ट आहे दिल तो पागल है या सुपरहिट चित्रपटातील. या चित्रपटाच्या वेळी एक वेगळीच घटना घडली. उत्तम सिंह जवळपास सात महिने यश चोप्रांच्या घरी संगीत बैठकीसाठी जात होते. प्रत्येक वेळी ते एकच धून वाजवायचे. तारा रा रा रा ररारा… ही धून ऐकून यश चोप्रा, आदित्य चोप्रा आणि पामेला चोप्रा अक्षरशः कंटाळले होते. त्यांना ही चाल काही खास वाटत नव्हती आणि ती वारंवार नाकारली जात होती.

3 / 5
ही धून अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित राहिली. मात्र एके दिवशी उदय चोप्रा यांनी ती ऐकली आणि ते लगेचच म्हणाले, हे गाणं खूप मोठं हिट होईल. उदयच्या या एका प्रतिक्रियेमुळे सगळ्यांचं लक्ष त्या चालीकडे वळलं.

ही धून अनेक महिन्यांपासून दुर्लक्षित राहिली. मात्र एके दिवशी उदय चोप्रा यांनी ती ऐकली आणि ते लगेचच म्हणाले, हे गाणं खूप मोठं हिट होईल. उदयच्या या एका प्रतिक्रियेमुळे सगळ्यांचं लक्ष त्या चालीकडे वळलं.

4 / 5
यानंतर गीतकार आनंद बक्षी यांना बोलावण्यात आलं. त्यांनी धून ऐकल्यानंतर काहीही न बोलता थेट बाथरूममध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा एकदा हे गाणं नाकारलं जाईल, असं वाटत होतं. पण काही वेळातच ते बाहेर आले आणि त्यांच्या ओठांवर शब्द होते, अरे रे रे ये क्या हुआ, तूने ना पहचाना…. अवघ्या 10 मिनिटांत या गाण्याचे बोल तयार झाले.

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा