PHOTO: इंग्लंड विरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्मासोबत कोण उतरणार?, भारतीय संघाकडे ‘हे’ चार पर्याय उपलब्ध

सरावादरम्यान फलंदाज मयांक अगरवाल दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे 4 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाला एका नव्या सलामीवीराची गरज आहे.

1/5
भारत आणि इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यापैकी पहिला सामना 4 ऑगस्टपासून नॉटिंगहॅम इथे खेळला जाणार आहे. पण  सामन्याआधी सरावादरम्यान मयांक अग्रवालच्या डोक्याला दुखापत झाली. गोलंदाज मोहम्मद सिराजने नेटमध्ये फेकलेला चेंडू त्याच्या हेल्मेटवर लागला आणि मयांक पहिल्या सामन्यातून बाहेर झाला आहे. ज्यामुळे भारतीय संघाला नवा सलामीवीर लागणार असून यासाठी 4 पर्याय उपलब्ध आहेत.

2/5
यावेळी भारतीय संघाकडे सर्वात पहिला पर्याय आहे केएल राहुल (KL Rahul). दोन वर्षापूर्वी वेस्टइंडीज संघाविरुद्ध शेवटची टेस्ट मॅच खेळलेल्या मयांककडे आता पुन्हा स्वत:ला सिद्ध करायची संधी आहे. राहुलने आतापर्यंत 35 टेस्ट सामन्यात सलीमीवीर म्हणून खेळत 1900 हून अधिक धावा करत 5 शतक ठोकले आहेत.

3/5
राहुलनंतर भारतीय संघाकडे सलामीवीर म्हणून राखीव खेळाडू  अभिमन्यु ईश्वरन (Abhimanyu Easwaran) याचाही पर्याय आहे. बंगाल रणजी संघाचा खेळाडू  ईश्वरन स्टँडबाय सलामीवीर म्हणून दौऱ्यावर असून त्यालाही संधूी दिली जाऊ शकते. त्याने प्रथम श्रेणी 64 सामन्यात 4 हजार 401 धावा करत 13 शतक आणि 18 अर्धशतकं ठोकली आहेत.

4/5
हनुमा विहारी (Hanuma Vihari) हा भारतीय संघाकडे असणारा तिसरा पर्याय आहे. विहारी मधल्या फळीतील फलंदाज असला तरी त्याने याआधी काही सामन्यात सलामीवीर म्हणून उतरत दिलासादायक कामगिरी केली आहे. 2019 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विहारीची सलामीवीर म्हणून कामगिरी उत्तम होती.

5/5
भारताकडे शेवटचा पण मजबूत पर्याय आहे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara). भारतीय संघातील महत्त्वाचा कसोटी फलंदाज पुजारा गरज पडल्यास सलामीला उतरु शकतो. त्याने आतापर्यंत 6 वेळा सलामीला उतरत एकदा शतक आणइ दोन वेळा अर्धशतकांसह 348 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्यालाही शर्मासोबत सलामीला पाठवले जाऊ शकते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI