IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यासाठी संघ घोषित करण्यास उशीर का? आता हे कारण आलं समोर

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात 1-1 ने बरोबरी आहे. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी संघ निवडताना निवड समितीची चांगलीच दमछाक झाली आहे. कोण खेळणार? कोण दुखापतग्रस्त यामुळे निवड समितीसमोर पेच निर्माण झाला आहे.

| Updated on: Feb 09, 2024 | 5:20 PM
भारत आणि इंग्लंड यांच्यात अजून तीन कसोटी सामने शिल्लक आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी टॉप 2 मध्ये राहणं गरजेचं आहे. सद्यस्थितीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे पहिल्या दोन संघात येण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील. पण संघ निवडीवरून निवड समितीची दमछाक होताना दिसत आहे.

1 / 7
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआय निवड समितीची बैठक गुरुवारी होणार होती. या बैठकीत उर्वरित तीन सामन्यांसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहेत. मात्र ही बैठक रद्द करण्यात आली. आता ही बैठक शुक्रवारी होणार आहे.

2 / 7
विराट कोहलीसाठी बीसीसीआयने आपली बैठक पुढे ढकलल्याची चर्चा होती. विराट कोहलीच्या निर्णयानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल अशी सूत्रांची माहिती होती.पण संघ निवडीला होणाऱ्या दिरंगाईचं वेगळंच कारण पुढे आलं आहे.

3 / 7
संघात विराट कोहली असावा की नसावा हा प्रश्न निवड समितीसमोर नाही. तर जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा निवडीमागचं खरं कारण आहे.

4 / 7
टीम इंडिया व्यवस्थापनाने बुमराहला तिसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्याचा विचार केला होता. पण बुमराहने राजकोटमध्ये खेळावे, अशी विनंती निवड समितीचे केली आहे. मोहम्मद सिराज असला तरी बुमराहची संघाला मदतच होईल असं निवड समितीने सांगितलं आहे.

5 / 7
बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या दोन कसोटीत 58 षटके टाकली आणि 15 गडी बाद केले. आता वर्कलोडबाबत बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या तपशीलवार वैद्यकीय अहवालाचे पुनरावलोकन केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

6 / 7
केएल राहुल आणि जडेजाच्या फिटनेस अहवालाची वाट बीसीसीआय पाहात आहे. क्वाड्रिसेप्सच्या दुखापतीमुळे राहुल दुसऱ्या कसोटीला मुकला होता. तर जडेजा दुखापतीमुळे बाहेर पडला होता. या दोघांची बेंगळुरू येथील एनसीएमध्ये फिटनेस चाचणी झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.