AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suruchi Adarkar- Piyush Ranade: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सुरुची अडारकर-पियुष रानडेच्या घरी लक्ष्मीचं आगमन; घटस्थापनेच्या मुहूर्तावर लेकीचा जन्म

Suruchi Adarkar: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घरी आलेल्या या चिमुकल्या पाहुणीमुळे त्यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. चाहत्यांनाही या जोडप्याच्या लेकीची पहिली झलक आणि तिच्या नावाची उत्सुकता लागली आहे.

| Updated on: Oct 11, 2026 | 1:28 PM
Share
मराठी मनोरंजनविश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी, अर्थात घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सुरुचीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

1 / 5
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली. त्यामुळे अडारकर आणि रानडे कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. आम्ही दोघंच होतो, आयुष्याने आम्हाला आमचा सर्वात सुंदर सहकारी दिला आहे, अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच लेकीचं आगमन झाल्याने या जोडप्यासाठी हा क्षण अधिक खास ठरला आहे.

2 / 5
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुलीचा जन्म झाल्याने चाहत्यांकडून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी समोर येताच चाहत्यांसह मनोरंजनविश्वातील कलाकारांनीही दोघांचं अभिनंदन केलं. नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अशा मंगलमय सणाच्या पहिल्याच दिवशी घरी लेकीचं आगमन झाल्याने या जोडप्यासाठी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे.

3 / 5
पियुष रानडेचं हे तिसरं लग्न आहे. सुरुची अडारकरसोबत लग्न करण्यापूर्वी पियुषने दोनदा लग्न केलं होतं. 2010 मध्ये त्याने फॅशन स्टायलिस्ट शाल्मली तोळ्येशी लग्नगाठ बांधली होती. मात्र, हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनंतर, म्हणजेच 2014 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला.

4 / 5
त्यानंतर पियुषच्या आयुष्यात अभिनेत्री मयुरी वाघ आली. ‘अस्मिता’ या मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली आणि पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर जानेवारी 2017 मध्ये पियुष आणि मयुरीने लग्न केलं. मात्र, हे लग्नही फार काळ टिकलं नाही. काही महिन्यांतच दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा झाल्या आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पियुषने अभिनेत्री सुरुची अडारकरसोबत लग्नगाठ बांधत आयुष्याची नवी सुरुवात केली. आता या जोडप्याच्या आयुष्यात मुलीच्या आगमनाने आनंदाची भर पडली आहे.

5 / 5
Follow Us
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका