PHOTO | चहापानाच्या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे नेते हजर, तर विरोधकांचा बहिष्कार; अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता

राज्यात सोमवारपासून (14 डिसेंबर) दिवसीय हिवाळी सुरु होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीर अधिवेशनाचा कालावधी फक्त दोन दिवसांचा ठेवण्यात आला आहे. (tea party assembly session)

  • Publish Date - 11:07 pm, Sun, 13 December 20
1/7
राज्यात सोमवारपासून (14 डिसेंबर)  हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे.  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी फक्त दोन दिवसांचा ठेवण्यात आला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार या अधिवेशनात सरकारतर्फे 6 अध्यादेश, 10 विधेयके चर्चेसाठी मांडली जाणार आहेत.

2/7
 सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनील परब, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, समाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे,  नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.

3/7
विरोधकांनी मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. हे अधिवेशन नागपूरला घेतले जावे अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, कोरोना महामारीमुळे हे अधिवेशन मुंबईला भरवण्यात येत आहे.

4/7
चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली यावेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीत अधिवेशनात मांडले जाणारे विधेयक तसेच इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

5/7
राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राज्य सरकारतर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधाकंवर सडकून टीका केली. तसेच, ओबीसी प्रवर्गातील समाजामध्ये गैरसमज पसरवू नये. त्यांच्या हक्काचं जे आहे, त्यातील एक कणही आम्ही कमी होऊ देणार नाही. त्यांच्या हक्काचं काहीच जाऊ देणार नाही,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

6/7
तसेच, यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यानी विरोधकांवर चौफेर टीका केली. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आपल्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणं चुकीचं असल्याचं मत त्यांनी मांडलं. तसेच, आपल्याच देशातील लोकांना देशद्रोही ठरवणं आपल्या संस्कारात बसत नसल्याचेही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

7/7
पाहा आणखी फोटो...
पाहा आणखी फोटो...

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI