Ind vs Eng: कोहलीची ‘ती’ चूक टीम इंडियाला नडली?

या सामन्यात ऋषभ पंतचे रनआऊट होणे आणि के.एल. राहुलचे अपयश भारताच्या पराभवाचे मुख्य कारण ठरल्याचे सांगितले जात आहे. | India vs England T20I

Mar 17, 2021 | 10:24 AM
Rohit Dhamnaskar

|

Mar 17, 2021 | 10:24 AM

इंग्लंडने टीम इंडियावर तिसऱ्या टी 20 सामन्यात (India vs England 3Rd T20I) 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या सामन्यात ऋषभ पंतचे रनआऊट होणे आणि के.एल. राहुलचे अपयश भारताच्या पराभवाचे मुख्य कारण ठरल्याचे सांगितले जात आहे.

1 / 6
भारताच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. के.एल. राहुल, इशान, किशान आणि रोहित शर्मा यांना चमकदार खेळी करता आली नाही. के.एल. राहुलला भोपळाही फोडता आला नाही. किशान 4 तर रोहित 15 रन्सवर आऊट झाला. याचमुळे भारतीय संघाला मॅचमध्ये पुनरागमन करता आला नाही. पहिल्या टी 20 मध्ये देखील भारतीय टॉप ऑर्डर्स बॅट्समनने सपशेल निराशा केली होती.

2 / 6
पहिल्यांचा बॅटिंग केल्यानंतर आणि कमी स्कोअर झाल्यानंतर फिल्डिंग करताना पूर्ण ताकदीने फिल्डिंग करावी लागते. मात्र भारतीय संघाकडून फिल्डिंगमध्ये काही चुका झालेल्या पाहायला मिळाल्या. भारतीय संघाच्या खेळाडूंनी इंग्लंड संघाच्या विकेट्स मिळवण्याच्या अनेक संधी गमावल्या. विराट कोहली आणि युजवेंद्र चहलने कॅचेस सोडल्या तर शार्दुल ठाकूरने म्हणावी अशी फिल्डिंग केली नाही. इशान किशननेही क्षेत्ररक्षणात चपळाई दाखवली नाही. साहजिक किशन आणि शार्दुलच्या हातात चेंडू गेल्यानंतर रन्स मिळवणं इंग्लंड संघाला सोपं गेलं.

3 / 6
पहिल्या पॉवरप्लेधमध्ये फलंदाजांनी आक्रमक खेळ करुन प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणायचं असतं. मात्र पहिल्या 6 ओव्हरमध्ये भारतीय फलंदाज 24 धावाच करु शकले. टॉप ऑडर्सच्या निराशाजनक खेळीनंतर अंतिमत: भारतीय संघाने 157 धावा केल्या. इथेच भारतीय संघ बॅकफूटला गेला. जास्त रन्स न झाल्याने इंग्लंड संघाला रोखण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आलं.

4 / 6
भारत फलंदाजी करताना पॉवरप्लेमध्ये 3 विकेट्स मिळाल्या होत्या. मात्र इंग्लंडच्या बॅटिंग दरम्यानच्या पॉवरप्लेमध्ये भारताला केवळ एकच विकेट्स मिळवता आली. या टी ट्वेन्टी मालिकेत भारताच्या बाबतीत असं दुसऱ्यांदा घडतंय की पॉवरप्लेमध्ये विकेट्स मिळवण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश येतंय.

5 / 6
इंग्लंडच्या जोस बटलरने तिसऱ्या टी ट्वेन्टीत धमाकेदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने 52 चेंडूत नाबाद 83 धावा केल्या. जॉस बटलर इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं नाही.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें