PHOTO | फिरकीचा राजा-युट्यूबची राणी, युजवेंद्र-धनश्री विवाहबद्ध

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल विवाहबंधनात अडकला आहे. चहलने कोरिओग्राफर आणि यूट्यूबर असलेल्या धनश्री वर्मासोबत लग्न केलं आहे.

1/6
टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि कॉरियोग्राफर धनश्री विवाबहबद्ध झाले आहेत. या दोघांचा विवाहसोहळा गुरुग्राम येथे 22 डिसेंबरला पार पडला. युजवेंद्र आणि  धनश्रीने इंस्टाग्रामवरुन ही माहिती दिली.  या विवाहसोहळ्याचं आयोजन गुरुग्राममधील कर्मा लेक रिसॉर्टमध्ये करण्यात आलं. मोजक्याच जणांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह पार पडला. युजवेंद्रची पत्नी धनश्री पेशाने कॉरियोग्राफर, डॉक्टर आणि युट्यूबर आहे.

2/6
युजवेंद्र आणि धनश्री हे दोघे पहिल्यांदा एप्रिल महिन्यात भेटले होते. या दोघांमध्ये सुरुवातीला गुरु-शिष्यांचं नातं होतं. कोरोना काळात सर्व ठप्प होतं. या रिकाम्या वेळेत काही नवं शिकायचं होतं. युजवेंद्रने धनश्रीला युट्यूबवर पाहिलं. अशा प्रकारे दोघांमध्ये प्रेमसंबंध वाढीस लागले.

3/6
युजवेंद्र फार विनम्र आहे. तसेच तो फार डाऊन टु अर्थ आहे. त्याचा साधेपणा मला फार भावला. मला युजवेंद्रसारखाच जीवनसाथी अपेक्षित होता, अशी प्रतिक्रिया धनश्रीने दिली.

4/6
युजवेंद्र-धनश्री यांचा काही महिन्यापूर्वी साखरपुडा पार  पडला होता. यानंतर धनश्री आयपीएल पाहण्यासाठी दुबईला गेली होती. धनश्री आयपीएलदरम्यान बंगळुरुला सपोर्ट करत होती.

5/6
युजवेंद्र-धनश्री गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी मोठा काळ एकमेकांसोबत घालवला. हे दोघे नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात.  दोघांनी याआधी सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर केले आहेत.

6/6
विशेष म्हणजे धनश्री-युजवेंद्र हे युट्यूबर आहेत. या दोघांमध्ये हा समान धागा आहे. चहल आपल्या युट्युबरुन टीम इंडियाच्या सहकाऱ्यांसोबतचे विनोदी तसेच मुलाखतीचे व्हिडीओ शेअर करत असतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI