AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 एपिसोड्सची सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज, भन्नाट कथा, दमदार अभिनय; ओटीटीवर येताच होतेय ट्रेंड

OTT : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच एक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या क्राइम थ्रिलर सीरिजने पहिल्याच आठवड्यात टॉप 10 ट्रेंडिंग सीरिजच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

| Updated on: May 25, 2026 | 10:37 AM
Share
तुम्हाला जर क्राइम वेब सीरिज आवडत असतील, तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच एक सीरिज प्रदर्शित झाली आहे. ही सीरिज सस्पेन्स आणि थ्रिलने परिपूर्ण आहे. ओटीटीवर येताच या सीरिजने टॉप ट्रेंडिंग यादीत स्थान मिळवलं आहे. एकूण आठ एपिसोड्सची ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे.

1 / 5
अवघ्या आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेल्या या सीरिजने इतर अनेक मोठ्या चित्रपट आणि सीरिजना मागे टाकत टॉप 10 ट्रेंड्समध्ये स्थान मिळवलं आहे. या सीरिजचं नाव आहे 'नेमेसिस'. हा एक सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलर आहे. या सीरिजची कथा लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या एक पोलीस आणि एका कुख्यात चोराच्या संघर्षाभोवती फिरते. या संघर्षामुळे त्यांचं वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त होतं.

2 / 5
या सीरिजमध्ये मॅथ्यू लॉ, यलान नोएल, गॅब्रिएला डेनिस, सोफिना ब्राऊन आणि एरियाना ग्वेरा यांनी भूमिका साकारल्या आहेत. 14 मे 2026 रोजी ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. समिक्षकांकडून या सीरिजला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी प्रेक्षकांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच ही सीरिज ओटीटीवर ट्रेंड होत आहे.

3 / 5
'नेमेसिस' ही सीरिज सध्या नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. याआधी ही सीरिज सातव्या क्रमांकावर होती. हळूहळू ती पहिल्या क्रमांकाकडे वाटचाल करत आहे. या सीरिजने 'माय रॉयल नेमेसिस' आणि 'द केस इज लीगल 2' यांसारख्या शोजनाही मागे टाकलं आहे.

4 / 5
कोर्टनी ए. केम्पच्या या क्राइम सीरिजचा प्रत्येक एपिसोड एक तासाचा असून असे एकूण आठ एपिसोड्स आहेत. जर तुम्ही एखाद्या दमदार क्राइम सीरिजच्या शोधात असाल, तर ही सीरिज तुमच्या वॉचलिस्टमध्ये आवर्जून समाविष्ट करण्यासारखी आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ