यावर्षी जगातील प्रतिष्ठित टाइम मासिकाने अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ची पदवी दिली आहे. 1930पासून आतापर्यंत कोणत्या सेलिब्रिटींना ‘पर्सन ऑफ द इयर’ ही पदवी मिळाली आहे ते जाणून घेऊया...
1 / 7
1930मध्ये टाइम मासिकाने महात्मा गांधी यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ ही पदवी दिली, तर 1938मध्ये जर्मनीचा शासक अॅडॉल्फ हिटलर ही पदवी दिली होती.
2 / 7
1939 मध्ये सोव्हिएत रशियाच्या कम्युनिस्ट नेते जोसेफ स्टालिन यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ ही पदवी मिळाली. तर, 1953मध्ये ब्रिटनच्या महाराणी ‘एलिझाबेथ-2’ यांना हा किताब मिळाला होता.
3 / 7
1992मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांना या किताबाने गौरवण्यात आले. तर 2001मध्ये अमेरिकेचे दुसरे अध्यक्ष जॉर्ज वॉकर बुश यांना ही पदवी मिळाली होती.
4 / 7
2007मध्ये रशियाचे विद्यमान राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ ही पदवी मिळाली. तर, दुसर्याच वर्षी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही या किताबाने गौरवण्यात आले.
5 / 7
2015 मध्ये टाइम मासिकाने जर्मनीच्या चांसलर अँजेला मर्केल यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ ही पदवी दिली. तर, 2016मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ‘पर्सन ऑफ द इयर’ बनले.
6 / 7
पर्यावरण चळवळीची जगातील सर्वात तरुण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग 2019मध्ये टाइम मासिकाची ‘पर्सन ऑफ द इयर’ बनली. तर 2020मध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बिडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना ‘पर्सन ऑफ द इयर’ने गौरवण्यात आले.