AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता रेल्वे प्रवासातही काढा पैसे, धावत्या रेल्वेत मिळणार एटीएम सुविधा

मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेस मध्ये आता एटीएम सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान पैसे काढण्यासाठी बाहेर पडण्याची गरज राहणार नाही. बँक ऑफ महाराष्ट्रने पुरवलेले हे एटीएम सुरक्षिततेचा विचार करून एका खास कोचमध्ये बसवण्यात आले आहे. ही सुविधा प्रवाशांसाठी खूपच उपयुक्त ठरेल आणि त्यांचा प्रवास अधिक सुलभ होईल.

| Updated on: Apr 16, 2025 | 2:32 PM
Share
रेल्वेने प्रवास करणं हे काही वेळा खूप जिकीरीचं असतं, काही प्रवास सोपे, छोटे पण काही प्रवासासाठी तर 15-20 तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. दरवेळेस ऑनसलाइन व्यवहार करणं शक्य नसतं, आणि काढलेले पैसे संपल्यावर प्रॉब्लेम येऊ शकतो.

1 / 8
पण आता प्रवासादरम्यान पैशांची चिंता करण्याची गरजच नाही, कारण आता धावत्या ट्रेनमध्येही प्रवाशांना एटीएमची सुविधा मिळणार आहे. प्रवाशांची पैसे काढण्याची गरज लक्षात घेऊन रेल्वेने आता ट्रेनमध्येच एटीएमची सोय सुरू केली आहे

2 / 8
 मुंबई ते मनमाडदरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास सुरू असतानाही प्रवाशांना पैसे काढता येणार आहेत.

3 / 8
 रेल्वेतच प्रवाशांना एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा बँकेने उपलब्ध केली असून एका बोगीच्या रिकाम्या स्पेस मध्ये हे एटीएम उभारण्यात आले असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

4 / 8
मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करुन एक खास कोच तयार करण्यात आला आहे. त्यातच हे एटीएम बसवण्यात आले असून हा कोच आता पंचवटी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. एटीएम सेवा असलेली ही  ट्रेन नुकतीच मुंबईत आली.

5 / 8
पंचवटी एक्स्प्रेसच्या एसी चेअर कारमध्ये हे एटीएम बसवण्यात आले आहे. कोचमधील पूर्वी न वापरलेल्या जागेत हे एटीएम बसवले असल्याने सीट्सची व्यवस्था किंवा इतर सुविधांवर परिणाम होणार नाही.

6 / 8
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमचे काम योग्य रितीने व्हावं यासाठी योग्य विद्युत प्रणाली आणि संरचनात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.

7 / 8
बँक ऑफ महाराष्ट्रने हे एटीएम मशीन पुरवले असून ते मशीन सुरक्षित राहण्यासाठी याला एक शटर देखील लावण्यात आलं आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासात ज्यांना पैशांची गरज असेल ते लोक एटीएममधून सहज पैसे काढू शकतात.

8 / 8
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.