PHOTO | वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी टीव्ही अभिनेत्रीचे 20 मिलिअन फॉलोअर्स, मोठमोठ्या कलाकारांना देतेय तगडी टक्कर!

‘अलादीन’ फेम अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) सध्या ‘हॅपी स्पेस’मध्ये आहे. इन्स्टाग्रामवर तिचे दोन कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. या सेलिब्रेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1/8
‘अलादीन’ फेम अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) सध्या ‘हॅपी स्पेस’मध्ये आहे. इन्स्टाग्रामवर तिचे दोन कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. या सेलिब्रेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/8
केक कापत असताना अवनीत छान छान फोटो पोझ दिल्या आहेत. अभिनेत्री अवनीत कौर ही एक सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे. तिच्या इंस्टा रील्सही खूप व्हायरल झाल्या आहेत.
3/8
अवघ्या 19 वर्षाची अवनीत कौर हिने टीव्हीच्या बड्या अभिनेत्री हिना खान (12.6m), रुबीना दिलैक (4.8m), रश्मि देसाई (4.4m), देवोलीना भट्टाचार्जी (2.2m), दिव्यांका त्रिपाठी (14.5m), श्वेता तिवारी (2.2m) यांना तगडी टक्कर दिली आहे.
4/8
अवनीतच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे तर तिने ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर’ या डान्स शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. उपांत्य फेरीच्या आधी ती या शोमधून बाहेर पडली होती. यानंतर तिने डान्स सुपरस्टार्समध्ये भाग घेतला होता.
5/8
2012मध्ये लाईफ ओकेच्या ‘मेरी मां’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यात त्याने झिलमिलची भूमिका केली होती. यानंतर ती ‘टेढे है पर मेरे हैं’मध्ये दिसली होती. कलर्सचा डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखलाजा’मध्येही तिने भाग घेतला होता.
6/8
अवनीतने ‘सावित्री’, ‘एक मुट्ठी आसमान’, ‘हमारी सिस्टर दीदी’, ‘अलादीन’, ‘किचन चॅम्पियन’ अशा अनेक कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट काम केले आहे. ‘अलादीन’ या शोमधून तिला जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती.
7/8
2014 मध्ये तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’पासून केली होती. यानंतर ती ‘मर्दानी 2’मध्ये देखील दिसली होती.
8/8
अवनीतने वेब सीरीजमध्ये देखील काम केले आहे. याशिवाय ती बर्‍याच म्युझिक व्हिडीओंचासुद्धा एक भाग बनली आहे.