AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा चित्रपट पाहून थिएटरमध्ये रडायचे प्रेक्षक, 25 वर्षांपूर्वी झालेला प्रदर्शित, केलेली बजेटच्या दुप्पट कमाई

25 वर्षांपूर्वीचा रोमँटिक थ्रिलर चित्रपट, जो पाहून थिएटरमध्ये रडायचे लोक. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली होती बजेटच्या दुप्पट कमाई.

| Updated on: Apr 28, 2026 | 2:30 PM
Share
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या रोमँटिक थ्रिलर चित्रपट 'प्यार तूने क्या किया'ला तब्बल 25 वर्षे पूर्ण झाली असून या निमित्ताने उर्मिलाने सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत त्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्या रोमँटिक थ्रिलर चित्रपट 'प्यार तूने क्या किया'ला तब्बल 25 वर्षे पूर्ण झाली असून या निमित्ताने उर्मिलाने सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत त्या आठवणींना उजाळा दिला आहे.

1 / 6
2001 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्या काळातील वेगळ्या धाटणीचा सायकोलॉजिकल थ्रिलर मानला जातो. या चित्रपटात उर्मिलाने ‘रिया’ नावाच्या एका तरुणीची भूमिका साकारली होती. जी एकतर्फी प्रेमात आकंठ बुडून जाते आणि त्या प्रेमासाठी कोणत्याही टोकाला जाण्यास तयार होते.

2 / 6
तिच्या या ‘जुनूनी प्रेमिका’च्या भूमिकेला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून मोठी दाद मिळाली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन रजत मुखर्जी यांनी केले होते. तर अभिनेता फरदीन खान याने ‘जय’ नावाच्या यशस्वी फोटोग्राफरची भूमिका साकारली होती. कथानकानुसार, गोव्यात जय आणि रिया यांची भेट होते.

3 / 6
रिया जयच्या प्रेमात पडते; मात्र हे प्रेम हळूहळू टोकापर्यंत पोहोचते. एकतर्फी प्रेम, आसक्ती आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक संघर्ष यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते.

रिया जयच्या प्रेमात पडते; मात्र हे प्रेम हळूहळू टोकापर्यंत पोहोचते. एकतर्फी प्रेम, आसक्ती आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक संघर्ष यांचे प्रभावी चित्रण या चित्रपटात पाहायला मिळते.

4 / 6
चित्रपटाचे संगीतही विशेष गाजले. विशेषतः ‘प्यार तूने क्या किया’ हे शीर्षक गीत आजही लोकप्रिय आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला सरासरी यश मिळाले असले तरीही त्याची कथा, सादरीकरण आणि उर्मिला मातोंडकरचा दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.

5 / 6
चित्रपटाच्या 25 वर्षांच्या प्रवासानिमित्त उर्मिलाने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे काही फोटो शेअर केले. या पोस्टमध्ये एका बाजूला स्वतःचा आणि दुसऱ्या बाजूला फरदीन खानचा फोटो दिसत आहे. फिल्म ‘प्यार तूने क्या किया’ ने रिलीज के 25 साल पूरे कर लिए हैं, असे लिहून तिने या खास क्षणाचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला.

6 / 6
Follow Us
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z
मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
Pradip Purnekar Case: मीनाक्षी शिंदेंची तीन तासांहून अधिक SIT चौकशी; नेमकं काय काय घडलं?
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी,
मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतापसिंह पाटील यांची मोठी आघाडी, सतीश चव्हाण पिछाडीवर
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या
शिवसेना अपात्रता प्रकरणी कोर्टात लढत, सुनावणी आधीच शिंदे गटातील बड्या नेत्याचं विधान
राजकीय मतभेद बाजूला! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार?
राजकीय मतभेद बाजूला! CM फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार? महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी...
MLC Election Result 2026 Updates : NCP शरद पवार गटाची धाकधुक वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून मोठी अपडेट समोर
पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच...
Breaking Updates : पुन्हा शिंदेंच्या बंडखोरीने भाजपचं टेन्शन वाढवलं? ऐनवेळीच... अमरावती मतदारसंघात मोठा उलटफेर
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...