Marathi News » Photo gallery » Venus planet will enter in sagittarius 5 zodiac sign will get benefits
Zodiac | शुक्र करणार धनू राशीत प्रवेश, या 5 राशींचे नशीब बदलून जाणार, गुप्तधनाचा लाभ होणार
सर्व ग्रहांमध्ये शुक्र ग्रह विलासी ग्रह मानला जातो. येत्या 29 जानेवारीला शुक्राचा हा राशी परिवर्तन करणार आहे. या दिवशी तो धनु राशीत प्रवेश करणार आहे. जेव्हा कोणता ग्रह आपली रास बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होत असतो. शुक्राच्या मार्गामुळे काही राशीच्या लोकांच्या जीवनात बदल घडतील. यासोबतच आर्थिक जीवनही चांगले राहील. चला जाणून घेऊया शुक्राचा हा बदल कोणत्या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
कन्या राशीच्या लोकांना कुटुंबातील सदस्यांकडून आर्थिक लाभ होईल. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळेल. प्रेम जोडीदाराशी संबंध मधुर होतील. नोकरीत आर्थिक लाभाचे जोरदार योग आहेत. नोकरीत पगार वाढू शकतो.
1 / 5
सिंह राशीच्या लोकांना शुक्राच्या मार्गाने मोठा फायदा होईल. तुम्हाला तुमच्या लाइफ पार्टनरसोबत सुंदर वेळ घालवण्याची संधी मिळेल. शुक्र-मार्गी काळात आर्थिक प्रगती होईल. याशिवाय नोकरीत बढतीचा लाभ मिळेल.
2 / 5
मेष राशींच्या व्यक्तींना शुक्र मार्ग बदलत असताना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. नोकरी आणि करिअरमध्ये वाढ होईल. व्यवसायात रखडलेली आर्थिक कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
3 / 5
धनु राशीत शुक्राच्या मार्ग बदलाच्या काळात आरोग्य चांगले राहील. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे पूर्ण प्रेम राहील. अचानक आर्थिक लाभ होईल. व्यवसायात धनलाभ होईल.
4 / 5
मिथुन राशींच्या अविवाहित लोकांसाठी विवाह होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. भागीदारी व्यवसायातून लाभ होईल. शुक्राच्या या बदलामुळे आरोग्य चांगले राहील. दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)