AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्यभराची कमाई एका झटक्यात मातीमोल, विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात या नुकसानीची दाहकता अधिक स्पष्टपणे दिसून येते. प्रचंड फळगळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी ६ ते ७ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

| Updated on: Sep 26, 2025 | 3:04 PM
Share
विदर्भाची ओळख असलेल्या संत्रा आणि मोसंबी पिकावर अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने मोठे संकट कोसळले आहे. सततच्या खराब हवामानामुळे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांत या फळपिकांचे अंदाजे २०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

1 / 8
या बागांमधील ८० ते ९० टक्के फळं गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विदर्भात साधारण सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर संत्री आणि मोसंबीची लागवड होते.

2 / 8
परंतु, सध्या बागांमध्ये पाहिल्यास सर्वत्र गळालेल्या फळांचा सडा दिसत आहे. प्रचंड फळगळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी ६ ते ७ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

3 / 8
पीक हातातून गेल्यामुळे संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे  ते पूर्णपणे हवालदील झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात या नुकसानीची दाहकता अधिक स्पष्टपणे दिसून येते.

4 / 8
जेलवाडी येथील शेतकरी दयाराम जुगसेनीया यांची तीन एकर मोसंबी बाग आहे. यंदा या बागेसाठी त्यांनी तीन ते चार लाख रुपये खर्च केला होता आणि त्यांना सुमारे १० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते.

5 / 8
मात्र, आता बागेत सर्वत्र फळ गळाल्याने त्यांचे हे उत्पन्न एक-दोन लाख रुपयेही होणार नाही. त्यांच्या बागेतील ८० ते ९० टक्के फळं जमिनीवर पडलेली पाहून शेतकऱ्यांच्या यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

6 / 8
यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यातील कमाई एका झटक्यात मातीमोल झाली आहे. या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी शासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

7 / 8
अतिवृष्टीमुळे झालेल्या या अभूतपूर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना तातडीने आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे.

8 / 8
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.