निवडणुकीसाठी एसटीच्या 10 हजार 500 बसेस आरक्षित, वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

Nupur Chilkulwar

|

Updated on: Oct 20, 2019 | 11:50 PM

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक निवडणूक प्रशासनाने राज्यातील विविध विभागात एसटीच्या 10 हजार 500 बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत. मोठ्या प्रमाणात एसटी बसेस निवडणूक कामकाजासाठी गेल्यामुळे त्याचा दैनंदिन वाहतुकीवर अंशत: परिणाम होऊ शकतो.

निवडणुकीसाठी एसटीच्या 10 हजार 500 बसेस आरक्षित, वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

Follow us on

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी उद्या 21 ऑक्टोबरला मतदान पार पडणार आहे (Maharashtra Assembly Elections). त्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांच्या सोई-सुविधांचीही पूर्ण तयारी करण्यात आली आहे. तसेच, मतदार केंद्रांवर सुरक्षा यंत्रणाही चोख ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय, विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्थानिक निवडणूक प्रशासनाने राज्यातील विविध विभागात एसटीच्या 10 हजार 500 बसेस प्रासंगिक करारावर घेतल्या आहेत (ST Buses Use for Election).

त्यामुळे सोमवारी एसटीच्या राज्यभरातील विविध मार्गांवरील सुमारे 18 हजार दैनंदिन फेऱ्यांपैकी 5 हजार फेऱ्या अंशत: अथवा पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या आहेत (ST Buses Use for Election). त्यामुळे दैनंदिन वाहतुकीवर थोडा परिणाम होऊ शकतो. यादरम्यान प्रवाशांना होणाऱ्या संभाव्य गैरसोयीबद्दल महामंडळाने दिलगिरीही व्यक्त केली आहे.

21 ऑक्टोबरला मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी, तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील सुट्टी असल्याने त्याचा विपरीत परिणाम दैनंदिन वाहतुकीवर होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, आवश्यक त्या मार्गांवर बसेस सोडण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.

ज्या मार्गांवर दिवसभरात जास्त फेऱ्या होतात, अशा मार्गांवरील फेऱ्या कमी करून, एखाद-दुसरी फेरी असणाऱ्या मार्गांवर सोडण्यात याव्यात. तसेच, कोणत्याही मार्गावरील अत्यावश्यक फेर्‍या बंद न करण्याचे निर्देश महामंडळ प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. जेणेकरून दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने प्रवाशांची गैरसोय होणार नाही. तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात एसटी बसेस निवडणूक कामकाजासाठी गेल्यामुळे दैनंदिन वाहतुकीवर अंशत: परिणाम होऊ शकतो.

संंबधित बातम्या :

मतदारांची संख्या, मतदान केंद्र ते ओळखपत्र, निवडणुकीची A टू Z माहिती

मतदान काही तासांवर, लोकशाहीच्या महाउत्सवाचा समग्र आढावा

मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी नाशिकच्या डॉक्टर आणि सलून चालकाची अनोखी ऑफर

मतदानावर पावसाचं सावट, राज्यात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाची हजेरी

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI