आघाडी सरकार म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं : अब्दुल सत्तार

अब्दुल सत्तार यांनी आज (28 ऑक्टोबर) अलिबाग येथे चक्रीवादळ, परतीचा पाऊस यामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली (Abdul Sattar on Uddhav Thackeray statement).

आघाडी सरकार म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं : अब्दुल सत्तार

रायगड : “राज्‍यातील महाविकास आघाडी सरकारमध्‍ये कोणतेही मतभेद नाहीत. आमची आघाडी म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा मजबूत जोड आहे. कदाचित आता तीनही पक्षांचा भविष्यातील निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णयही झाला असेल”, असा दावा शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला (Abdul Sattar on Uddhav Thackeray statement).

अब्दुल सत्तार यांनी आज (28 ऑक्टोबर) अलिबाग येथे चक्रीवादळ, परतीचा पाऊस यामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असेल्या कामांचादेखील आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांना दिलेल्या आदेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपलं परखड मत मांडलं.

“मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं एक हाती सरकार म्‍हणजे जे सरकार आहे त्‍याचे दोन बाजूचे हात आणि आमचं सरकार. भगवं सरकार 5 वर्षे टिकलं पाहिजे असा त्‍याचा अर्थ असावा. तर सज्‍ज रहा म्‍हणजे देशाच्‍या सीमेवर जसा सैनिक सज्‍ज असतो तसा शिवसैनिकही सज्‍ज असला पाहिजे. कारण कधीही काहीही होवू शकतं”, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली (Abdul Sattar on Uddhav Thackeray statement).

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (27 ऑक्टोबर) रात्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पक्षाच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. रात्री 10 वाजता सुरु झालेली ही बैठक मध्यरात्री एक वाजेपर्यंत चालली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल यादृष्टीने आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश दिल्याचे समजते. यावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय : शरद पवार

दरम्यान, महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या घोषणेचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खोचक शैलीत समाचार घेतला. शिवसेनेचा भगवा फडकवा, हे भाषण 30 वर्षांपासून ऐकत आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा करण्याचं स्वातंत्र्य आहे. यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. भाजपाला दूर ठेवण्यासाठी एकत्र आलात तर लोकांना चांगली फळं मिळताना दिसत आहेत, त्यामुळे त्याच दिशेने काम करा, असे शरद पवार यांनी म्हटले.

संबंधित बातम्या :

शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याच्या तयारीला लागा, उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

शिवसेनेचा भगवा फडकेल, पण तो पकडायला उद्धव ठाकरे एकटेच उरतील; सोमय्यांनी उडवली खिल्ली

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI