महायुतीत धुसफूस, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांची नाराजी, नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अजित पवार यांनी महायुतीच्या समन्वयकांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महायुतीत धुसफूस, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांची नाराजी, नेमकं प्रकरण काय?
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांचा प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 7:46 PM

देशात आणि राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगलेली बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात तर मतदानाचे तीन टप्पे देखील पार पडले आहेत. आता फक्त दोन टप्पे शिल्लक राहिलेले आहेत. उरलेल्या दोन टप्प्यांसाठी जोरदार प्रचार सुरु आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत राज्यात बघायला मिळत आहेत. महायुतीच्या उमेदवारांकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जातोय. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या दोन्ही बाजूने सुरु असतानाच महायुतीमधील धुसफूसीची एक बातमी समोर आली आहे. भाजपचे बडे नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आम्हाला फक्त शरद पवार यांचा पराभव करायचा आहे. बाकी काही नको, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी बारामतीत केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

“शेवटी राजकारणात एक तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलकं आहे, आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्याला शरद पवार यांचा पराभव हवा आहे. बाकी काही नको”, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर अजित पवार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

महायुतीच्या समन्वयक बैठकीत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. “हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते”, अशी खंत अजित पवारांनी महायुतीच्या समन्वय बैठकीत बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.