‘शिवतीर्थ’मध्ये पाहुण्यांच्या भेटीचा सिलसिला सुरूच; सुनेत्रा पवारांनी घेतली राज ठाकरेंच्या कुटुंबीयांची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आपले नवे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थमध्ये गृहप्रवेश केला. तेव्हापासून  राज ठाकरेंच्या नव्या घरी पाहुण्यांच्या सदिच्छा भेटींचा सिलसिला सुरूच आहे. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी  सुनेत्रा पवार यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली.

'शिवतीर्थ'मध्ये पाहुण्यांच्या भेटीचा सिलसिला सुरूच; सुनेत्रा पवारांनी घेतली राज ठाकरेंच्या कुटुंबीयांची भेट

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आपले नवे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थमध्ये गृहप्रवेश केला. तेव्हापासून  राज ठाकरेंच्या नव्या घरी पाहुण्यांच्या सदिच्छा भेटींचा सिलसिला सुरूच आहे. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी  सुनेत्रा पवार यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत भोजनाचा अस्वाद देखील घेतला. सुनेत्रा पवार यांचे राज ठाकरे यांच्या कुटुंबीयांसोबतचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

 राजकीय वर्तृळात भेटीची चर्चा

राज्यामधील काही महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होत आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेचा देखील समावेश आहे. महापालिका निवडणुकींमध्ये मनसे भाजपासोबत युती करणार असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची अनेकदा भेट देखील झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र आता  राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी देखील राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानण्यात येत आहे.

‘असं’ आहे राज ठाकरेंचं नवं घर

‘कृष्णकुंज’शेजारी बांधण्यात आलेल्या शिवतीर्थ या पाच मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याच इमारतीतमध्ये  मनसेचे मुख्य कार्यालय देखील आहे. इतर मजल्यावर ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये सुसज्ज सर्व सोयी सुविधांनी युक्त असे एक भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मोठा दिवस, ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय दौऱ्यावर, अजेंडा काय?

Jalgao : आमचा 25 वर्षांचा संसार मोडला, गिरीश महाजन यांचा टोला, महाजनांना जयंत पाटील, नवाब मलिकांचं प्रत्युत्तर

मंत्र्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार आणि एसटी कर्मचाऱ्याला 12 हजार पगार हे चुकीचंच’, बच्चू कडूंचा घरचा आहेर

Published On - 7:30 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI