Tanmay Fadnavis | पुतण्या तन्मयच्या लसीवर फडणवीसांनी हात झटकले, अमृता काकी म्हणतात…

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी 'याला म्हणतात विशेषाधिकार' असं म्हणत ताशेरे ओढले होते. त्याला अमृता फडणवीसांनी उत्तर दिलं. (Amruta Fadnavis Tanmay Fadnavis )

Tanmay Fadnavis | पुतण्या तन्मयच्या लसीवर फडणवीसांनी हात झटकले, अमृता काकी म्हणतात...
देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि तन्मय फडणवीस
अनिश बेंद्रे

|

Apr 20, 2021 | 2:39 PM

मुंबई : तन्मय फडणवीस (Tanmay Fadnavis) आपला दूरचा नातेवाईक आहे, असं म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हात झटकले आहेत. तर भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत यासाठी पावलं उचला, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि तन्मयच्या काकी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सोयीस्कर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या टीकेला अमृता फडणवीसांनी उत्तर दिले. (Amruta Fadnavis reacts after Devendra Fadnavis nephew Tanmay Fadnavis gets Corona Vaccine)

देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्नांचं वादळ उठलं आहे. त्यावरुन शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘याला म्हणतात विशेषाधिकार’ असं म्हणत ताशेरे ओढले होते. त्याला अमृता फडणवीसांनी उत्तर दिलं.

अमृता फडणवीस यांचे ट्वीट काय?

“कोणत्याही सेवेची प्राथमिकता ही शिष्टाचार किंवा प्रचलित धोरणाच्या आधारे असावी. नियम आणि कायद्याच्या वर कोणीही नाही. कायदा आपले काम करु शकतो आणि आम्ही नेहमीच न्यायासाठी उभे आहोत! आम्ही या विषयावर आपल्यासोबत आहोत. कृपया भविष्यात रांगा तोडण्याचे प्रकार थांबवण्यासाठी योग्य कृती करा!” असे संदिग्ध ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

(Amruta Fadnavis reacts after Devendra Fadnavis nephew Tanmay Fadnavis gets Corona Vaccine)

येत्या एक मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्याची मुभा मिळाली आहे. परंतु त्याआधीच पंचविशीतील तरुणाला लस कशी मिळाली, हा प्रश्न विचारला जात आहे.

तन्मय फडणवीस हे माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू, तर देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधू अभिजीत फडणवीस यांचे सुपुत्र आहेत. तन्मय लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी तो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले.

कोण आहेत तन्मय फडणवीस?

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे

माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू

अभिनेता असल्याचा ट्विटरवर उल्लेख

नागपुरातील पब्लिक फिगर असे इन्स्टाग्राम बायोमध्ये मेन्शन

संबंधित बातम्या :

‘चाचा विधायक है हमारे’ लशीवरुन टीकेची झोड उठलेला फडणवीसांचा पुतण्या तन्मय आहे कोण?

फडणवीसांच्या 25 वर्षीय पुतण्याला लस, आव्हाडांचे दोन शब्दात तन्मयला टोले

तन्मय दूरचा नातेवाईक, कोरोना लशीवरील सवालानंतर फडणवीसांनी हात झटकले

(Amruta Fadnavis reacts after Devendra Fadnavis nephew Tanmay Fadnavis gets Corona Vaccine)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें