OBC Reservation |आंदोलन केले की पोलिसांना समोर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो |Yogesh Tilekar

| Updated on: May 25, 2022 | 3:04 PM

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मोर्चा काढण्यात आला. कार्यकर्ते सैरभेर झाले आहेत. अडीच वर्ष मविआ सरकारने ओबीसींच्या राजकिय आरक्षणाचा खेळ खंडोबा केला

Follow us on

आज ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी मोर्चा काढण्यात आला. कार्यकर्ते सैरभेर झाले आहेत. अडीच वर्ष मविआ सरकारने ओबीसींच्या राजकिय आरक्षणाचा खेळ खंडोबा केला,  मध्यप्रदेशात मिळालं इथे का मिळत नाही, हा प्रश्न भाजप नेते योगेश टिळेकर यांनी केला आहे. याना जाग आणण्यासाठी आज मंत्रालयावर मोर्चा काढला, ‘जोर जूलूम के टक्कर में संघर्ष हमारा नारा हैं.. सरकार हमसे डरती है, पूलिस को आगे करती हैं…’अशा घोषणा देत हा मोर्चा आज मंत्रालय परिसरात काढण्यात आला.  मुख्यमंत्र्यांनी ५२ टक्के ओबीसींचा आवाज आज ऐकावा. हे सरकार एनसीपीच्या शरद पवारांच्या इशाऱ्यावर  चालत आहे, त्यांच्या हातात तिजोरीचा चाव्या छगन भूजबळ , जितेंद्र आव्हाड, वडेट्टीवार यांचं सरकारमध्ये कुणी ऐकत नाही. अर्थमंत्र्यांनी ओबीसी आयोगाला नीधी दिला नाही, वेळ काढूपणा करतंय. साडे तीन महिन्यात सरकारने इंपेरिकल डेटा गोळा करावा. सरकार पवारांच्या दबावात काम करत आहे, शिवसेनेनं मंडळ आयोगाला विरोध केला तर भूजबळ बाहेर पडतील. आज हजारो कार्यकर्ते 36 जिल्ह्यातून येणार, हा ओबीसी समाजाचा मोर्चा.भाजपची ओबीसी विंग रस्त्यावर ऊतरणार.  जर ठोस निर्णय झाला नाही तर जिल्ह्यात मोर्चे निघणार. असं ही योगेश टिळेकर म्हणाले आहेत.