संजय राऊतांची तुरुंगात वेगळी सेटिंग, अग्रलेख कसा लिहायचे? अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट!
अनिल देशमुख यांनी तुरुंगात असताना नेमकं काय घडलं, याची माहिती दिली आहे. त्यांनी राऊतांविषयी मोठे गौप्यस्फोट केले आहेत.

Anil Deshmukh : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नकरातला स्वर्ग या पुस्तकामुळे मोठे राजकीय वादंग निर्माण झाले होते. या पुस्तकात त्यांनी तुरुंगातील अनेक प्रसंगांची माहिती दिलेली आहे. याच पुस्तकात त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत तरुंगात घालवलेल्या दिवसांचाही उल्लेख केलेला आहे. दरम्यान, आता अनिल देशमुख यांनीही तुरुंगातील दिवसांची आठवण काढताना संजय राऊतांबाबत गौप्यस्फोट केला आहे.राऊत त्यांच्या सामना या दैनिकासाठी कसे अग्रलेख लिहायचे याबाबतची माहिती देशमुख यांनी दिली आहे.
राऊतांना खोट्या केसेसमधे फसवून तुरुंगात टाकलं
ईडी, सीबीआयचा वापर करून अनेकांना अनेक पक्षांना फोडण्यात आलं. देशात अनेक मोठ्या नेत्यांना समन्स पाठवलीजातायत, सोनिया गांधी ते शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे या नेत्यांच्या जवळच्या लोकांना समन्स पाठवण्यात आले. बदला घेण्याचे काम सध्या सुरू आहे. संजय राऊत यांना खोट्या केसेसमधे फसवून तुरुंगात टाकलं होतं, असा मोठा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
परमवीर सिंह, सचिन वाझेंना निलंबित केलं
तसेच, त्यांना कसं फसवण्यात आलं, याबाबतही देशमुख यांनी सविस्तर माहिती दिली. मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो. उद्योगपती मुकेश अंबानी प्रकरण समोर आलं.सचिन वाझे आणि पोलीस आयुक्त यांनी प्लॅनिंग केलं होतं. माझ्या आणि उद्धव साहेबांसमोर बातमी आली तेव्हा तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना निलंबित करण्यात आलं. सचिन वाझेलाही निलंबित करण्यात आलं. त्याने मग रागाने माझ्यावर आरोप केले, असा दावा देशमुख यांनी केला.
मी आणि संजय राऊत एकत्र होतो
ईडी, सीबीआय अशा यंत्रणांनी माझ्या घरी आणि इतर 170 ठिकाणी धाड टाकली. माझी 6 वर्षांची नात आहे. तिला अधिकाऱ्यांनी कॅडबरी चॉकलेट देऊन 20 मिनिटे चौकशी केली. माझ्या पत्नीला देखील याचा मोठा त्रास झाला. माझ्या पत्नीला कर्करोग झाला. मी जुळवून घेतलं असतं तर चित्र वेगळं असतं. पण की समझोता केला नाही. मी आणि संजय राऊत एकत्र होतो, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
निल देशमुख यांना घरचा डबा का?
तसेच, माझी आणि राऊत साहेबांची भेट व्हायची संजय राऊत यांना घरचा डबा होता. मला घरच्या डब्याची परवानगी दिली नव्हती. मी न्यायाधीशांचं नाव सांगत नाही, पण त्यांनी सांगितल होत की महात्मा गांधी तुरुंगातला डबा खात होते. मग अनिल देशमुख यांना घरचा डबा का? असं हे न्यायाधीश म्हणाल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
त्यांनी व्यवस्थित यंत्रणा लावली होती
संजय राऊत यांना जेव्हा जेव्हा भेटायला जायचो तेव्हा ते काहीतरी लिहत बसलेले असायचे. मी बोलायचो काय लिहताय ते मला म्हणायचे उद्याचा सामना वाचा. आतमध्ये त्यांनी व्यवस्थित यंत्रणा लावली होती, असा गोप्यस्फोटही देशमुख यांनी केला. संजय राऊत यांच्या आग्रहावरून मी पुस्तक लिहायला घेतलं. संजय यांच्या आग्रहाखातर मी लेखक झालो, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.
